Hijab Row न्यायालयाची सोमवारी सुणावनी, तर सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल उच्च न्यायालय म्हणाले की, “फक्त काही दिवसांचा प्रश्न, आग्रह धरू नका”

मराठी ई-बातम्या टीम

शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालून येण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकातील वातावरण चिघळले असून मुलींच्या हिजाब वापरण्यास प्रत्युत्तर म्हणून मुलांनी भगवे उपरणे घालून येण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुस्लिम मुलींना पाहून या मुलांकडून जय श्रीराम घोषणा देण्यात येत आहेत. त्यामुळे इथल्या तापत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काही मुस्लिम मुलींनी दाखल केलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर सुणावनी सुरु असून आज झालेल्या सुणावनी दरम्यान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आता फक्त काही दिवसांचा प्रश्न असून तोपर्यत शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी धार्मिक अनुषंगाने पेहराव करण्याबाबतत आग्रह धरू नये असे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले.

न्यायालयाच्या या निर्देशांवर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

कर्नाटकच्या उडुपीमध्ये बुरखा परिधान करण्यावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बुरखा किंवा हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या काही विद्यार्थिनींना कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. तिथून या प्रकरणाला सुरूवात झाली आहे. यानंतर या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणी सुरू झाली.

या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश रितु राज अवस्थी,न्यायाधीश कृष्णा दिक्षित, न्यायाधीश जे.एम.काझी यांच्या पूर्ण खंडपीठासमोर याची सुणावनी सुरु आहे. या याचिकेवर आता सोमवारी २.३० वाजता पुढील सुणावनी घेण्यात येणार असल्याचे आज युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने जाहिर केली.

हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना कर्नाटकमध्ये सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

एका मुलीचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून सदरची विरद्यार्थीनी महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचं उपरणं हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. ही मुलगी पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना देखील ही मुलं मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचं दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगी देखील नंतर अल्ला हो अकबर अशा घोषणा देताना दिसत आहे.

दरम्यान, हिजाब परिधान प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर ९ न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोर सुणावनी घेण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती एन.व्ही रामण्णा यांच्याकडे केली.

About Editor

Check Also

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी जंतर-मंतरवर नेमके काय दिसले अभिजीत दिपके, सोनाम वांगचुक आल्यावर नेमकी काय भूमिका मांडली

शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास, नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेकडो आंदोलकांच्या गर्दीत एक ८३ वर्षीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *