विशेष बातमी

महाविद्यालयीनस्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लवकरच भरती तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनातील वाढीचा मंत्री तावडेंचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेत्तर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याच बरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद …

Read More »

अखेर राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ सरकारकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाने शासनादेश जारी केला आहे. राज्यात ३५५ तालुके असून यापैकी सांगली जिल्ह्यातील जत, कवठे-महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगांव तर सातारा जिल्ह्यातील माण- दहिवडी, सोलापूर जिल्ह्यातील …

Read More »

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार शिधापत्रिकेवर एक किलो साखर देणार असल्याची मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिवाळी निमित्ताने शिधापत्रिकाधारकांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. आता शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड 1 किलो याप्रमाणे साखर वाटप करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना सदर साखरेचे प्रति कुटुंब 1 किलोप्रमाणे व प्रतीकिलो 20 रु. दराने नोव्हेंबरच्या अन्नधान्य वाटपासोबत e PoS द्वारे …

Read More »

२२ हजार कोटींच्या गुंतवणूकीसाठी १० हजार कोटींची सबसिडी धारावी प्रकल्पातील गुंतवणूकीसाठी राज्य सरकारची अभिनव शक्कल

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी झोपडपट्टी पुर्नवसनाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्यातील फडणवीस सरकारने पुढाकार घेतला. या पुर्नवसनासाठी २२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची तयारी काही गुंतवणूकदारांनी दाखविली असली तरी, या गुंतवणूकीच्या बदल्यात राज्य सरकारकडून तब्बल १० हजार कोटी रूपयांची सबसिडी गुंतवणूकदाराला देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

निवृत्तीवेतन हवय तर ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा वित्त विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय सेवेतून निवृत्त तसेच राज्य शासकीय निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ते ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील तिथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वांद्रे येथील वित्त विभागाच्या उपअधिदान व लेखा अधिकारी रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे. अधिदान व …

Read More »

भक्तिमय शक्तिमय सावरगाव !! ना.पंकजाताई मुंडे यांच्या शब्दात भगवान बाबांचे महात्मे

गेले अनेक वर्षे झुंज देणे , प्राणपणाने सामना करणे हे माझ्या सवयीचे झाले आहे ! ‘संघर्ष’ शब्द टाळला कारण तो आता कोणिही वापरतं !! पण हजारो लाखो लोक काय म्हणतात हे ऐकण्याची पद्धत काय ,त्याची मानकं काय ???लोकांची भाषा समजावून सांगणारा ट्रान्सलेटर कोण ?? …लोकांचे कान, लोकंच शब्द, लोकांच परिणाम …

Read More »

एम.पी. मिल प्रकरणानंतरही नगरविकास विभागाच्या धोरणात स्पष्टता नाहीच ३०० चौ.फु.चे घराबाबत एसआऱएला अहवाल सादर करण्याचे गृहनिर्माण विभागाचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी ताडदेव येथील एसआरएच्या प्रकल्पातील रहिवाशांना वाढीव स्वरूपाचे बांधकाम देण्याच्या निर्णयात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संशयाच्या भोवऱ्यात आले. तरीही मुंबईचा सुधारीत विकास आराखड्यास मंजूरी देताना झोपडपट्टी पुर्नविकास योजनेतील घरे २६९ चौरस फुटाची देण्याऐवजी ३०० चौरस फुटाची घरे देण्याची तरतूद नगरविकास विकास विभागाने आराखड्याच्या नियमावलीत …

Read More »

अहो अधिकाऱ्यांनो कामे करा नाहीतर मंत्र्यांना लोक शिव्या घालतील पीए, ओएसडींची जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना विनंत्या

मुंबईः प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारला ४ वर्षे पूर्ण झालेली असून डिसेंबर ते मार्च दरम्यान लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीच्या सोबतच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने सर्वच मंत्र्यांच्या पीए, ओएसडी आणि खाजगी सचिवांकडून मंत्र्याकडे गाऱ्हाणी घेवून येणाऱ्या लोकांची कामे करावीत यासाठी त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ …

Read More »

म.गांधींच्या जयंती दिनीच मंत्रालयात स्वच्छतेचे तीन तेरा लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची दुरावस्था

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन स्वच्छता दिवस म्हणून पाळण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु मंत्रालयातील स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्वच्छतेचीच दुरावस्था झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालविला जातो. …

Read More »

शासकिय कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख मिळणार जि.प., विद्यापीठ, अनुदानीत संस्थामधील कर्मचाऱ्यांनाही लागू होणार सरकारचा शासन निर्णय लागू

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कायद्यानुसार २००५ सालानंतर शासकिय सेवेत रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन योजनेऐवजी अंशदान पेन्शन योजना लागू होते. त्यामुळे सरकारी नोकरदारांना निवृत्तीवेतन तुटपुंजे मिळते. तसेच त्याचे अकाली निधन झाले तरी त्याच्या कुटुंबियांनाही फारसी सरकारी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शासकिय नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे कामाला लागून १० वर्षाच्या आत …

Read More »