विशेष बातमी

उमेद अभियानांतर्गत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करणार नाही अफवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका -मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेल्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असून त्या तशाच पुर्ववत सुरु राहणार आहेत. याबद्दल निर्माण करण्यात आलेले समज चुकीचे आहेत. महिला वर्गाने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू  नये, असे आवाहन अभियानाचे …

Read More »

याच ट्विटमुळे भाजपाशासित राज्यात अभिनेत्री कंगना विरोधात गुन्हा दाखल होणार कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना आदेश

बंगलोर : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्या विरोधावर टीका करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने शेतकऱ्यांना लक्ष्य करत ट्विट्द्वारे आंतकवादी असल्याची टीका केली. त्यावर तुमकुरू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता त्यावरील सुणावनी दरम्यान न्यायालयाने कंगना …

Read More »

एमपीएससीची परिक्षा पुन्हा ढकलली पुढे पण वयोमर्यादा तीच राहणार नव्या तारखेस होणाऱ्या परीक्षेस सध्याचे पात्र उमेदवार बसू शकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना …

Read More »

राज्यातील बार-रेस्टॉरंटची वेळ ठरली, या कालावधीत सुरु राहणार पर्यटन विभागाकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ जाहीर करत असताना बार-रेस्टॉरंट सुरु करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र या गोष्टी उघडण्याची-बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे सर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येवू लागली. अखेर यावर तोडगा काढत या व्यवस्थापनासाठी सकाळी …

Read More »

प्रियंका आणि राहुलच्या संवेदनशिलतेला भाजपकडून मोदींच्या व्हिडिओचे असेही उत्तर कोण सर्वाधिक संवेदनशील स्पर्धा सुरु?

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित पीडीत मृत मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती न सोपविता पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांना दोन दिवस डांबून ठेवत पोलिसांच्या एसआयटी टिम व्यतीरिक्त कोणालाही भेटू किंवा फोनवरून संपर्क करू दिला नाही. या पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी  काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका …

Read More »

बाबरी मस्जिद प्रकरणाची चौकशी करणारे न्या.लिबरहान म्हणतात, “बाबरीचा निकाल म्हणजे फार्स” आयोगाने जी माहिती गोळा केली त्याच्या विरूध्द निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाबरी मस्जिद पाडण्याच्यी घटना घडल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यसाठी तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंगराव यांनी न्या.लिबरहान आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे काम १७ वर्षे चालले. त्या १७ वर्षात आयोगाने १०० साक्षीदार तपासले आणि अनेकांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या गोष्टी पाह्यल्या आणि त्यानुसार …

Read More »

क्रीडा धोरण असूनही राज्यातील शेवटचा घटक अजूनही उपेक्षित शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या क्रीडा धोरणाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत

ठाणे : विशाल मोरेकर राष्ट्रीय स्तरावर आखण्यात आलेल्या क्रीडा धोरणाप्रमाणे राज्यातही १९९४, २०१२ आणि आता २०२० क्रीडा धोरण आखण्यात आले. परंतु राज्याच्या क्रीडा विभागाने या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने शेवटच्या घटकांपर्यंत त्याचा फायदा होत नाही. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या क्रीडा धोरणांची आवश्यकता असून त्यापद्धतीने आखणी करणे शक्य …

Read More »

महाविकास आघाडीविरोधात भाजपाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणत असल्याची भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्यासह तीन खासदांराचे पत्र

मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून डिसेंबर २०१९ पासून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि प्रसारमाध्यमांच्या फ्रिडम् ऑफ स्पीच या संकल्पनेवर गदा आणली जात आहे. तसेच राज्यात राज्य सरकार पुरस्कृत गुंडागर्दी सुरु असल्याचा मुद्दा उपस्थित करत मानवी हक्क आयोगाने यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी भाजपा नेते तथा खासदार विनय सहस्त्रबुध्दे, …

Read More »

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्विटरवर ट्रेंड १.१४ मिलियन ट्विटच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारण, बेरोजगारी, सरकारी कंपन्यांच्या विक्रीवरून प्रश्नांची सरबती

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय नेत्यांच्या वाढदिवसाला वर्तमान पत्रे, टेलिव्हिजन यासह सोशल मिडियावर शुभेच्छांचा ट्रेंड आपल्याला नवा नाही. परंतु सलग दोनवेळा देशाच्या पंतप्रधान पदी विरोजमान झालेले नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना ट्विटरवर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्रेंड केला जात असून मोदीजी नोकऱ्या कुठे आहेत? जीडीपी रसातळाला गेलाय,  असा सवाल नेटकऱ्यांकडून …

Read More »

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी निवडणूक का‌ळात ३ वेळा माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचना जारी

नवी दिल्ली- मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत.या अनुषंगाने आयोगाने ११ सप्टेंबर, २०२० रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट …

Read More »