विडंबनात्मक गाण्यावरून राजकिय धुराळा उडाला ते कुणाल कामराचं नेमकी गाणी काय एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींवर टीका केल्याची चर्चा आरोप

काल संध्याकाळी स्टॅड अप काँमेडियन कुणाल कामरा याचा एक तासाचा शो मुंबईत रेकॉर्ड करण्यात आला. त्या शो मध्ये चार ते पाच विविध गाणी रेकॉर्ड करण्यात आला. त्यातील एक गाण ठाणे की रिक्षा…चेहरे पे दाढी आणि लडको बेरोजगार रेखेंग पर हम डिग्री नही दिखाएंगे तानाशाही या दोन गाण्यांची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. मात्र सध्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी या हे गाणे एकनाथ शिंदे यांच्यावर असल्याचे सांगत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेत आणि विधानसभेत एकच गदारोळ केला. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्याची वेळ आली.

दरम्यान, स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने जे गाण गायलं त्यावरून त्या गाण्यातील बोल काहीसे असे आहेत, ठाणे की रिक्षा चेगरे पे दाढी, सब कुछ चुरायेंगे, एम पी चपरायेंगे, एमएलए भी चुरागेंने असे सांगत गद्दारी भी करेंगे असे सांगत अप्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सध्याच्या राजकिय परिस्थितीवर विडंबनात्मक गाणं रचलं आणि ते गाणं रिलीजही केलं.

त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यात महत्वाचं गाणं असल्याचे कुणाल कामरा याने सांगत मोदी के चंचल चरित्र पर ये गाना है असेही सांगितले. उन्होने बीस साल एकतर्फा नफरत मे एक इटालियन महिला के पिछे गवाने वाले है अब अगले बीस साल एकतर्फा प्यार मे इटालियन महिला के पिछे गवाने वाले है, मोदी मेलोनीजी के पिझ्झा पॅन लेकर घुम रहे है, ढोका पिझ्झा सिखा रहे है उन्हे, असे सांगत कुणाल कामराने गाणं म्हणायला सुरूवात केली. गाण्याची सुरुवात करताना कुणाल कामरा म्हणाला की, झुठा हुँ मै, कातील भी हूँ, सब घोटालोमे शामील भी हूँ एमपी चुराना, व्हाईसेस दबाना बस यही मेरा कसूर, अपने वादोंसे मै मुकरता नही पूरा उन्हे कभी करता नही तानाशाह ओ तानाशाह गे गाणं गायलं गायलं आहे. हे गाणं शाहरूख खान याच्या बादशाह या गाण्याच्या चालीवरून रचण्यात आलं आहे.

त्याचबरोबर कुणाल कामरा याने कोविड काळावरूनही टीका करताना गाण्यात म्हणाला की, कोविड आला बाहेरच्या देशातून आणि देशात लावला लॉकडाऊन लावला. पाच वाजता थाळी वाचविण्याची अक्टीव्हीटी देण्यात आली. या थाळी बजविण्याचा काय उपयोग झाला असा सवाल करत मी हे बघायला उभा होतो की दंगल झाली, तर माझ्या घरात कोण कोण येईल ते बघायला मी उभा होतो, असे सांगत खिल्लीही उडविली.

त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पाळीव यंत्रणा म्हणून टीका करण्यात येणाऱ्या ईडी आणि सीबीआयवरही कुणाल कामराने एक स्वतंत्र गाणं रचत ते ही प्रसारीत केलं. ईडी सीबीआयला मोदींनी मुभा दिली आहे, महाराष्ट्रात ईडीने करून दाखवले आहे, जे मिशनरींना करता आलं नाही. सीबीआय जो पिछे लग जाये या ईडी सताये आजा पास हमारे, काहे घबराये पार्टी मेरी भ्रष्टाचारी, संघ की आग्याकारी जिस के सीर पे हात फेरो चार्जशीट हो जाए कोरी, मर्डरर हो या रेपिस्ट सबको बेल मिल जाए हे प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी वॉकर यांच्या प्रसिद्ध तेल मालिश या गाण्याच्या चालीवर रचण्यात आले आहे.

स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने सादर केलेल्या गाण्याच्याची लिंक खास वाचकांसाठी

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर राहुल गांधी यांची टीका हे सगळे अपयशाचे पुरावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि परदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *