Tag Archives: आरोग्य मंत्री

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन कर्करोगाबाबत जागृती, तपासणी आणि उपचार अशा तीन स्तरावर मोहीम

राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यात येत असून नागरिकांनी या तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, पॅलियेटिव्ह केअर आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात ‘पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ, मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचा मोठा निर्णय, नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण आदिवासी भागातील रिक्तपदे भरण्याचा क्रांतिकारी निर्णय

राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती करताना, व सेवांतर्गत पदव्युतर पदवी उत्तीर्ण झालेल्या (पीजी) उमेदवाराना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील. गेल्या वर्षभरात …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नका खासगी किंवा शासकीय रूग्णालयांना आदेश

राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. प्रधानमंत्री जनआरोग्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचा निर्णय, ‘सेवाखंड क्षमापित’ आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होणार

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या अस्थायी सेवाकाळातील ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेत निश्चितच गुणात्मक सुधारणा होईल, अशी आशा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. निर्णयाचा थेट लाभ …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई यांत्रिक धुलाई सेवेचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आरोग्य भवन येथे यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रकाश आबिटकर म्हणाले की, या उपक्रमामुळे राज्यातील २० जिल्हा रुग्णालये, आठ सामान्य रुग्णालये, …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क संचलन मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसी, एनएचएआय, अशा अनेक संस्थाच्या वतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क व संचलन, मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, खासगी लॅबना चाप लावण्यासाठी कायदा करणार बोगस औषधे शोधण्यासाठी खास यंत्रासह भरारी पथक

राज्यात आरोग्य चाचण्यांशी निगडित अनेक खासगी लॅब कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी  कोणतीही संस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे या खासगी लॅबवर अंकुश ठेवण्यासाठी  विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात कायदा करणार  असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी येथे दिली. प्रकाश आबिटकर यांची माहिती म्हणाले, याशिवाय रूग्णांना जी औषधे मिळतात ती बोगस …

Read More »