Tag Archives: देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात करारनाम्याचे हस्तांतरण

मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा ‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांची माहिती, अहिल्यादेवीचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक...

स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या. अखंड …

Read More »

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, देशातील पहिल्या कचरामुक्त शहराची संकल्पना साकार खासगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प, ·तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया ; २८ टन गॅसची निर्मिती

देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भांडेवाडी परिसरात केवा सुस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच अवैध धंदे… कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणवीसांनी प्रायश्चित घ्यावे; पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पुणे विषारी दारूकांड प्रकरणात कठोर कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रकरणी दिले आदेश

पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून या  प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. तसेच  ही इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुणे विषारी दारूकांडात सुमारे १३ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल ‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची  तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. ‍‍ मुंबईतील बीकेसी येथे ‘मुंबई टेक विक २०२६’ चे मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवित केली मागणी

कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे मतही पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत …

Read More »