Tag Archives: मुख्यमंत्री

भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री नितीशकुमार विश्वासदर्शक ठराव जिंकणार की?

बिहारमधील जनता दल संयुक्त, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सत्तास्थानी विराजमान झालेल्या महागठबंधन सरकारचा वर्षभरातच राजीनामा देत पुन्हा भाजपाच्या पाठिंब्यावर जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. उद्या सोमवारी १२ तारखेला भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, मॉरिसने स्वतःवर गोळी मारून घेतली की कोणी मारली?

महाराष्ट्र आणि मुंबईत सलग झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी राजकिय आणि सामाजिक वातावरण चांगलेच हादरून गेलेले आहे. त्यातच शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुंड मॉरिस याने समेटाच्या निमित्ताने त्याच्या कार्यालयात बोलावून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाहेर आले. यावरून अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस …

Read More »

अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरच पलटवार

मागील काही दिवसात राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करत ठार मारल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. तर पुण्यातील अज्ञात इसमांनी भाजपाच्या माजी नगरसेवकावर शस्त्रास्त्राने हल्ला करत खुन करण्यात आला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शिवसेना उबाठा गटाचे …

Read More »

सामाजिक न्याय विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व,अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी निधी

संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, …

Read More »

पंजाब आणि चंदिगढचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा

काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात प्रशासनिक संघर्ष निर्माण झाला होता. यावरून भगवंत मान सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयानेही भगवंत मान सरकारची बाजू उचलून धरत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगढ शहराच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे गुंडाराज…

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करत आहेत यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलीसांवर प्रचंड दबाव असून कायद्याने काम करु दिले जात नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी

राज्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना महाराष्ट्रातील पहिलीच असावी. मुंबई उपनगरातील उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती …

Read More »

भाजपा आमदार गोळीबार प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला, मोदींची गॅरंटी

मुंबई उपनगरातील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना गोळीबाराच्या घटनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य

राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश देतानाच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. यामुळे महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर उपाययोजना करणे शक्य होईल, असे …

Read More »