भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृह विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच
देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही
निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मुंबईतील भूखंडांची श्वेतपत्रिका काढा मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने देण्याचा भाजपा महायुती सरकारचा सपाटा, सर्वसामन्यांच्या घरांकडे मात्र दुर्लक्ष
मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पंतप्रधानांनी भाषणात अतिवृष्टी आणि पुराबाबत चकार शब्द काढला नाही नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही!
महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले, विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?
अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसान भरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा मुख्यमंत्र्यांना सुरजागडच्या खाणीतून मिळणाऱ्या मलईतच जास्त रस
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट …
Read More »
Marathi e-Batmya