राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांवर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातील …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आवाहन, विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे कर्जमाफीपासून वाढवण बंदरापर्यंत, मेट्रोपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सरकारच्या कामांचा आढावा
शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी निर्णय घेतले आहेत. कर्जमाफी, शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, उद्योग गुंतवणूक, मेट्रो, विमानतळ, महामार्ग, बंदरे आणि गृहनिर्माण यांसारख्या विविध क्षेत्रांत राज्याने मोठी झेप घेतली असून विरोधकांनी बहिष्काराचे राजकारण सोडून सभागृहात येऊन विधायक चर्चा …
Read More »अमित शाह यांची माहिती, १५०० कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू कृतज्ञता सोहळ्यात बोलताना अमित शाह यांची माहिती
दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल १५०० कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत …
Read More »खासदार वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे लेखी हमीची मागणी धारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी
धारावीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सध्या सुरू असून, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून धारावीतील नागरिकांच्या सर्वांगीण सामाजिक, आर्थिक विकासाशी निगडित आहे. त्यामुळे धारावीतील रहिवासी, त्यांचे रोजगार, उद्योगधंदे आणि स्थानिक सामाजिक व्यवस्था (इकोसिस्टम) यांना या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करून एक विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात करारनाम्याचे हस्तांतरण
मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री …
Read More »अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मौन
मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणीस अद्यापही सुरुवात केली नाही. त्यातच यंदाचा पावसाळा आता तोंडावर आलेला असताना कर्जमाफीची अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा तुटवडा असल्याने आणि विविध प्रकल्पांवर सध्या खर्च सुरु असल्याने कर्जमाफीसाठी पैसा कोठून …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मत, अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवात …
Read More »उपमुख्यमत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा सखोल चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश
पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. कडक कारवाईचे …
Read More »एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच …
Read More »
Marathi e-Batmya