सुनेत्रा अजित पवार यांचे आश्वासन, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती पिंपळवंडीयेथे साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या

पिंपळवंडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
फास्ट ट्रॅक कोर्टासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार

या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.”

पीडित कुटुंबाची लवकरच घेणार भेट

पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्या लवकरच स्वतः पिंपळवंडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

About Editor

Check Also

विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *