Tag Archives: काँग्रेस

डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात दुवा आता काँग्रेसकडून समन्वय समितीचा सिद्धरामय्या यांच्याकडून काँग्रेस हायकंमाडला समन्वय समितीचा प्रस्ताव

डी के शिवकुमार यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांनी, पक्ष आणि सरकार यांच्यात दुवा म्हणून काम करण्यासाठी काँग्रेस हायकमांडला समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. २०१८ मध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या काळात समन्वय समितीचे अध्यक्ष राहिलेल्या या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने, त्याच मॉडेलचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, सत्तापिपासू भाजपा महायुतीकडून घोडेबाजार, सत्ता व पैशांचा प्रचंड गैरवापर विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत, काँग्रेस ८, शिवसेना ४ तर एनसीपी ३ जागांवर लढणार

राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या अर्धा डझन मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता कांद्याला १५०० रुपये नाही तर ३००० रुपयेच भाव द्या, बकरी ईदच्या निमित्ताने दंगली भडकवण्याचे भाजपाचे षडयंत्र, भाजपाच्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, देशात लॉकडाऊन सारखी स्थिती… आरसी बुक बघून इंधन देण्यात येत असल्याचा आरोप

देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने होरपळत असताना भाजपा सरकार मात्र धार्मिक ध्रुवीकरण, इव्हेंटबाजी आणि भावनिक मुद्द्यांच्या आड आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. इंधन तुटवडा आणि वाढत्या दरांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवत विजय वडेट्टीवार म्हणाले, वाहनाचे आरसी बुक …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर (SIR) प्रक्रियेतून एकाही मुंबईकराचे नाव वगळले जाणार नाही याची खबरदारी घ्या जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. भाजपा सरकारने केलेल्या या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स समोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार, दोन दिवसात निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाजपा सरकार हादरले, दिल्लीतून महाराष्ट्रात रिकाम्या हाताने येऊ नका

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR कार्यक्रम राबवू नका, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू …

Read More »

अखेर कर्नाटकात नेतृत्वबदल होणार, नवे मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार? नवी दिल्लीत काँग्रेस हाय कमांडने मुख्यमंत्री एस सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार यांच्या उपस्थितीत घेतली बैठक

महिन्यांच्या संघर्षानंतर, नकारांनंतर आणि काळजीपूर्वक रचलेल्या सार्वजनिक सलोख्यानंतर, कर्नाटकात आता सत्तांतर होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बंद दाराआड सांगितले की, त्यांनी बाजूला व्हावे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मार्ग मोकळा करावा. काँग्रेस नेतृत्वासाठी, हा निर्णय एका नेत्याला पुरस्कृत करण्यापेक्षा, राजस्थानसारख्या संकटात रूपांतर होण्यापूर्वी धुमसत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे मोदी- फडणवीस सरकारच जबाबदार कांद्याच्या हमीभावासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये मविआचा शेतकरी क्रांती महामोर्चा, प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव द्या

कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र …

Read More »