महायुती सरकारची कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. यात सरकारने टाकलेले अटी शर्तींचे जाळे पाहिले तर ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे की त्यांच्याभोवती कर्जाचा विळखा अधिक घट्ट करण्यासाठी आहे हा प्रश्न पडतो. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले पीक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून विरोधी उमेदवारांना कोट्यवधींच्या ऑफर्स सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली; भाजपाला इलेक्शन नाही तर नॉमिनेशन सिस्टिम आणायचीय
भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ …
Read More »राहुल गांधी यांचे भाकित, नरेंद्र मोदी वर्षभरही पंतप्रधान पदावर टीकणार नाहीत मोदी सरकार संस्थात्मक बंडाला सामोरे जाण्याच्या स्थितीत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षभरात पदावर टिकणार नाहीत. मोदी सरकार एका “संस्थात्मक बंडा”चा सामना करत असून, त्याबद्दल राहुल गांधी यांनी व्यवस्थेमधूनच “आतली माहिती” मिळत असल्याचा दावाही केला. बुधवारी (३ जून, २०२६) काँग्रेसच्या राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक संमेलनात, पक्षाच्या एका बंद दाराआडच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कर्जमाफी निव्वळ धुळफेक, ५० % पेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार फडणवीस सरकारने आधी ८० लाख लाडक्या बहिणींना निकष लावून अपात्र ठरवले, आता शेतकऱ्यांचीही नियम लावून घोर फसवणूक
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. या योजनेमध्ये शब्दच्छल करून नियम, अटी व शर्ती टाकून जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवलेले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र- महायुती सरकारचा निर्णय म्हणजे ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ सत्तेतील भावांकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, मते घेताना निकष आठवले नाहीत का?
भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून महिना १५०० रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत महिलांची मते घेतली. आता सत्तेत आल्यानंतर या सरकारला निकष, अटी, शर्थी दिसू लागल्या आहेत. सरकारने निकष लागू करत ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. मते हवी होती त्यावेळी कोणतेही निकष न पाहता योजना जाहीर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्ग रोखला
शेतक-यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील …
Read More »राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, त्यांना आंब्यावर बोलायला वेळ होता सीबीएसईच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅनिंगच्या घोळामुळे गोंधळ
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इयत्ता १२वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीसाठीच्या बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकार आणि सीबीएसईवर आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. व्यावसायिक उपकरणांऐवजी मोबाईल फोन वापरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या गेल्याचे नवीन दावे त्यांनी केले आहेत. सीबीएसईच्या पहिल्या डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाचा चेहरा बनलेल्या विद्यार्थ्यांशी …
Read More »राहुल गांधी त्या विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून देशद्रोही ठरलात सीबीएसई बोर्डाकडे उत्तर पत्रिकेची प्रत मागणाऱ्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी केली चर्चा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, आपल्या परीक्षेतील गुणांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या सीबीएसईच्या इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या गटासोबतच्या त्यांच्या संवादाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, राहुल गांधी यांनी बोर्डाच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पुनर्मूल्यांकनादरम्यान त्यांना कथितरित्या आढळलेल्या विसंगतींवर चर्चा केली. “माझ्या सहकारी …
Read More »सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?
केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच अवैध धंदे… कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणवीसांनी प्रायश्चित घ्यावे; पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी …
Read More »
Marathi e-Batmya