Tag Archives: चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना पत्र,.. ४ जूनला जल्लोष करू

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या मुलाखतीतवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत पाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना देत याची उत्तरे देण्याचे …

Read More »

पालघरचे खासदार डॉ राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे विद्यमान खासदार डॉ राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा राजेंद्र …

Read More »

प्रविण दरेकर यांचा पलटवार, शरद पवारांचे ते मूर्तीबाबतचे विधान ढोंगीपणाचे

अयोध्येतील राम मंदीरावरून आधीच राजकिय आणि सामाजिकस्तरावर विविध मते मतांतरे आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येतील रामाच्या मुर्तीसोबत सीतेची मुर्ती का नाही असा सवाल उपस्थित करत सबंध महिलांच्या मनात कुतूहुल निर्माण झाल्याचे मत पुणे जिल्यातील एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केले. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खडसेंच्या प्रवेशावर केंद्र आणि राज्य समिती…

भाजपा पक्षात येण्याचा जर एकनाथ खडसे यांचे मत असेल, तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करत आहोतच. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही कारण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातला भारत आणि त्या उद्देशासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत त्यांचे स्वागत आहेच. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने…

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत

मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला असा उपरोधिक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग…

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा …

Read More »

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे असा उपरोधिक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. पुढे बोलताना भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी भावाला घरातून हाकलून दिले

नुकतेच शिवसेना उबाठा गटाचे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची प्रवृत्ती असल्याचे बोलले. औरंगजेबाची प्रवृत्ती खरे तर उद्धव ठाकरे यांच्यातच असून सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी सख्या भावाला घरातून बाहेर काढले. वडिलांना कैदेत ठेवल्याचा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. गडचिरोलीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात …

Read More »