पालघरचे खासदार डॉ राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे विद्यमान खासदार डॉ राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा राजेंद्र गावित यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले.

खा राजेंद्र गावित यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमदार, खासदार आणि आदिवासी विकास मंत्री असा राजकारणातील मोठा अनुभव गाठीशी असणा-या राजेंद्र गावित यांचा एका अर्थी भाजपा मध्ये पुनर्प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच गावित यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. खा.गावित यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीपेक्षा राज्यात अधिक होणार आहे. या दृष्टीने त्यांच्या संमतीनेच पालघरमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे. खा.गावित यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही नमूद केले .

खा राजेंद्र  गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. यापुढे भाजपा नेतृत्व जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन, असेही खा.गावित यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *