Tag Archives: देवेंद्र फडणवीस

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख…. तंत्रज्ञानाने विधी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा: मुख्यमंत्री

येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. सर्वांचा सहभाग व समर्पणातून निर्माण झालेल्या या विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसांचा विजय, ५ जूलैला मोर्चा नाहीतर जल्लोष अहो अहवाल स्विकारला पण पान उघडायच्या आधीच सरकार पाडलं

आगामी ५ जूलै रोजी राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पक्षाच्या सहभागात राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेसंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, हिंदी भाषेसंदर्भातील पूर्वीचे दोन्ही जीआर निर्णय रद्द आता त्रिसुत्री भाषेसाठी डॉ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती, समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेणार

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारी चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तरीही राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या अनुषंगाने राज्य सरकारने जारी केलेले शासन निर्णय रद्द करण्यात …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, डॉ आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क महत्वाचे पाऊल संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण संविधानाच्या उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपाचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू व मराठीचा गळा घोटू देणार नाही असा …

Read More »

जोजो थॉमस यांची मागणी, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा आमदार गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन समाजाबद्दलचे द्वेषपूर्ण भाषण घटनेला आव्हान

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पाच वर्षात २६ टक्के वीज दर कमी राज्य नियामक आयोगाच्या निकालानंतर दिली माहिती

राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणाले की, साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर, थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी …

Read More »