Tag Archives: देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे आठ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ, मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली,  राज्य माहिती आयोगात तीन अतिरिक्त आयुक्त, सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, एअर इंडिया इमारतीच्या नुतनीकरणात लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य द्या मुख्य सचिवांना निर्देश संबंधितांची एक बैठक घेऊन सुयोग्य नियोजन करा

राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर इंडिया इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया इमारतीसंदर्भातील सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दशित …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, गडकरींचा राजीनामा घ्या पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर द्यावा रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’ चे उद्घाटन

शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केले. रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’च्या उद्घाटन …

Read More »

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत या इमारतीच्या दुर्घटनेत १९ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच  प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि  स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश

आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार, एनडीपीएस खालील प्रकरणासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन, कुर्डूवाडी येथे दिवाणी न्यायालयास मान्यता, कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयास मान्यता, अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेडसह यवतमाळला अनन्य विशेष न्यायालये, गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर अधिक कठोर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार

पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीसाठी संबंधित कामांना गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गारगाई जलसिंचन प्रकल्प आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी, हजारो रुग्णांनी घेतला 'महाआरोग्य शिबिरा'चा लाभ

आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत …

Read More »