Tag Archives: फडणवीस

सचिन सावंत यांचा सवाल, दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागाचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी

पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, या समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील …

Read More »

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मौन

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणीस अद्यापही सुरुवात केली नाही. त्यातच यंदाचा पावसाळा आता तोंडावर आलेला असताना कर्जमाफीची अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा तुटवडा असल्याने आणि विविध प्रकल्पांवर सध्या खर्च सुरु असल्याने कर्जमाफीसाठी पैसा कोठून …

Read More »

मुंबईत मेट्रोच्या पिलर्सचा भाग कोसळून अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी कारचे नुकसान, नुकसान आणि अपघाताची नुकसान भरपाई एमएमआरडीए देणार

मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा एक भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. या घटनेत जवळच्या कारचाही काही भाग खराब झाला. जॉन्सन अँड जॉन्सन कारखान्याबाहेर, गजबजलेल्या एलबीएस रोडवर दुपारी १२.२० च्या सुमारास हा अपघात झाला. बांधकामादरम्यान सिमेंटच्या रचनेचा एक भाग खाली पडला …

Read More »

आशिष शेलार यांच्या पाठपुराव्याला यश, मुंबई उपनगरातील पशुप्रेमींना दिलासा मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय़

गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास रु. ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता आजच देण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल, राही सरनोबत आणि शहीद सूद वर सरकारकडून अन्याय का ? सुवर्ण पदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या, शहीद सूद कुंटुबियांना मदत करा

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

सुनिल केदार प्रकरणी राज्य सरकारकडून राजपत्र प्रकाशित आमदारकी रद्द केल्याचे राजपत्र केले जाहिर

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर असताना १५० कोटी रूपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सावनेरचे काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांना पाच एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे तातडीने राज्य सरकारकडून राजपत्र प्रकाशित करत सुनिल केदार यांची आमदारकी रद्दबातल ठरविली. यासंदर्भात काँग्रेस पक्षासह अन्य कायदे तज्ञांमध्ये राज्य सरकारच्या जलद गतीने निर्णय अमलात आणण्याच्या …

Read More »