काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या अध्यक्षपदी प्रा ज्ञानेश्वर गायकवाड यांची नियुक्ती वैद्यकीय कक्षाच्या ३० जिल्हा व शहर अध्यक्षांचीही नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांच्या सोबत वैद्यकीय कक्षाच्या ३० जिल्हा व शहर अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना स्थानिक स्तरावर मदत मिळणे अधिक सुलभ होणार असून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आरोग्य विषयक प्रश्नांना संघटितपणे हाताळण्यास मदत होणार आहे.

गरजू रुग्णांना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणे, वैद्यकीय उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन करणे आणि आवश्यकतेनुसार आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला करणे. सरकारी व खासगी रुग्णालये, डॉक्टर, रक्तपेढ्या आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधणे तसेच आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवणे हे या मदत कक्षाचे काम आहे.

About Editor

Check Also

रुग्णालयांच्या उपचारांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आवाहन वैद्यकीय व आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठीही पॅकेजचे शुल्क पारदर्शक ठेवण्याचे आवाहन

रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा व सुविधांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *