Tag Archives: भाजपा

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याप्रकऱणी केली टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकरणावर …

Read More »

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द

चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या. तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रामगिरी शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप

‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …

Read More »

मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रेदशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुहास माटे, योगेश आवळे, गोविंद गायकवाड, विनोद पानगिळे, अजय गमरे आदी उपस्थित होते. वेतन सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल योगेश आवळे आणि विरेंद्र ठाकर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या …

Read More »

उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन एनडीएचे उमेदवार एनडीएच्या बैठकीत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून शिक्कामोर्तब

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कोईम्बतूरचे दोन वेळा लोकसभेचे खासदार सी.पी. भाजपाच्या संसदीय मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राधाकृष्णन (६८) हे भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असतील. भाजपा संसदीय मंडळाची बैठक संपल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा mयांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. “महाराष्ट्राचे विद्यमान …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत दाखवा स्वप्नांचे व्यापारी देवेंद्र फडणवीस- दुबई सारखे शहर बनवण्याआधी १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत ते दाखवा

काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी म्हणाले की दोन वर्षांमध्ये भारतात अमेरिकेसारखे रस्ते होतील. आता मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी म्हणतात की एमएमआर मध्ये दुबई पेक्षा मोठे सुंदर शहर वसवू. भाजपा नेत्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातील ९०% …

Read More »

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे सोमवारी मुंबईत जोरदार स्वागत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडेल. श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दहीहंडी द्वारे गोविंदा पथकांचा सैन्य दलाच्या शौर्याला सलाम शहर व उपनगरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा

“ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

भाजपा नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरी केला पक्ष प्रवेश

नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराkeष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे …

Read More »