Tag Archives: भाजपा

हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार, भाजपाचे नेतेच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करतायत वेंद्र फडणवीसांच्या कारभारावरील टीकेने मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते? छत्रपतींच्या अपमानाने मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का?

महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, असे …

Read More »

नितेश राणे यांचे आश्वासन, नीलकमल बोट अपघात प्रकरणी अहवालानंतर दोषींवर कारवाई विधान परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे , या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री …

Read More »

विधान परिषदेत हर्षवर्धन सपकाळ पडले एकटे, भाजपा आणि शिवसेना उबाठा एकत्र अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ

विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले असल्याचा मुद्दा उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला …

Read More »

अजित पवार यांचा विरोधकांना टोला, तुमच्याकडे आमदारच नाही, १०-२० टाळकी पाठिंबा देणार का? शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी टाळकी शब्दावर घेतला आक्षेप

नुकताच होळी आणि धुलवड सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू असे विधान केले. तसेच बुरा ना मानो होली है असे सांगायलाही विसरले नाहीत. त्यावरून राज्यात महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे …

Read More »

अजित पवार म्हणाले, जयंतराव ऊसाचं टनेज वाढलं की नाही… पण तुमचा… संबध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही मिश्कील संवाद

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या राज्यात सुरु आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला आज अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार हे सातत्याने जयंतराव पाटील यांना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे महाराष्ट्र बदलायचाय? आधी नागपूर, चंद्रपूर बदला न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही महसूल विभागाकडून भलतीच नावे सातबाऱ्यावर

राज्यात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार अशी घोषणा केली. इतकेच काय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरात सुर मिसळत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर अर्थसंकल्प सादर करताना अशीच घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल …

Read More »

रामदास आठवले यांचा टोला, झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून आठवलेंनी लगावला टोला

देशातील इतर भाजपा शासित राज्यात वापरण्यात आलेल्या मुद्यांची कॉपी करत महाराष्ट्रातही धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी झटका आणि हलाल मटणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध …

Read More »

भाजपाकडून विधान परिषदेसाठी ३ जणांची नावे जाहिरः अर्जाचा शेवटचा दिवस सोमवार शिंदे शिवसेनेने कडून आणि अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी

विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. या पाच जागांसाठी भाजपाचे तीन आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या हिश्शाला प्रत्येकी एक उमेदवार असे मिळून पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तीन …

Read More »

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णयः मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४ टक्के आरक्षण २ कोटी रूपयांपर्यंतच्या निविदेत ४ टक्के आरक्षण, भाजपाची काँग्रेसवर टीका

मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४% आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपाने काँग्रेसवर “तुष्टीकरणाचे राजकारण” केल्याचा आरोप केला आहे आणि राहुल गांधी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव पाडल्याचा आरोप केला आहे. “कर्नाटक सरकारचा मुस्लिमांसाठी ४% आरक्षणाचा प्रस्ताव राहुल गांधींच्या पूर्ण पाठिंब्याने मंजूर करण्यात आला आहे. आम्ही हे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना सभ्यता, संस्कृती व लोकशाहीची मुल्ये जोपासलेल्या सिंधुदुर्गात आता ‘हम करो सो कायदा’ म्हणणारे लोक

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक …

Read More »