Tag Archives: मुख्यमंत्री

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, गडकरींचा राजीनामा घ्या पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील १९ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ २० जणांच्या मंत्रिमंडळातील सहकारी एका महिला आमदाराने घेतली नाही मंत्री पदाची शपथ

सोमवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेसच्या एकोणीस आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, तर एकमेव महिला उमेदवार गायत्री शांतेगौडा या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होत्या. दोन महिन्यांपूर्वी डी के  शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने, बंगळूरू येथील लोक भवनात आयोजित एका सोहळ्यात राज्यपाल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर द्यावा रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’ चे उद्घाटन

शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केले. रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’च्या उद्घाटन …

Read More »

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची सर्वपक्षिय बैठकीत स्पष्टोक्ती, राजकारणापेक्षा शेतकऱ्यांची हित महत्वाचे कावेरी नदी पाणी वाटप प्रकरणी सर्वपक्षिय बैठकीत मांडली भूमिका

राज्यातील जनतेचा राजकीय मतभेद बाजूला सारून आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजूट राहण्याचा इतिहास असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत सांगितले. कावेरी जल नियमन समितीने (CWRC) १५ दिवसांसाठी दररोज ३,५०० क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर, तामिळनाडूसोबतच्या कावेरी पाणीवाटप वादावर राज्याची कायदेशीर आणि राजकीय रणनीती आखण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय …

Read More »

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत या इमारतीच्या दुर्घटनेत १९ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच  प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि  स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश

आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात चिकन बिर्याणी देण्याचा मुख्यमंत्री विजय यांचा विचार मध्यान भोजनात अंडी देण्याच्या निर्णयानंतर आता चिकन बिर्याणी देण्याचा विचार

तामिळनाडू सरकार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याच्या प्रस्तावर विचार करत आहे. शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी ही कल्पना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर मांडली. या प्रस्तावावर बोलताना राजमोहन म्हणाले की, राज्यातील प्रत्येक प्रमुख राजकीय काळात शालेय पोषण कार्यक्रम आपापल्या परीने अधिक मजबूत करण्यात आला …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार, एनडीपीएस खालील प्रकरणासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन, कुर्डूवाडी येथे दिवाणी न्यायालयास मान्यता, कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयास मान्यता, अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेडसह यवतमाळला अनन्य विशेष न्यायालये, गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर अधिक कठोर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन प्रकल्प महत्त्वपूर्ण उन्नत सामुहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे प्रकल्पांचे सादरीकरण

पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामुहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. …

Read More »