मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री …
Read More »मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कोकणातील पाणी आणणार मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे
मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले एकीकडे पंतप्रधान तेल कमी वापरा सांगतात दुसरीकडे पंतप्रधान यांच्या वाढदिवशी दिवे लावा अस भाजप अध्यक्ष बोलतात, कोणाचे खरे? भाजपाला टोला
मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार झुकले यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. मात्र …
Read More »भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना
एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत सिद्धिविनायक मंदिर तसेच लालबागच्या राजासह अनेक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिरांना भेट देऊन विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी नितीन नबीन यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे शालेय मित्र असगर अली वोराची जमिन आमदार नरेंद्र मेहता यांनी परत केली मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या बरोबरच्या बैठकीत जागा परत दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शालेय मित्र असलेले ८१ वर्षीय असगर अली वोरा यांना, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या मालमत्ता वादात पंतप्रधानांकडे हस्तक्षेप मागितल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथील त्यांची जमीन भाजप आमदाराकडून परत मिळाली. मंगळवारी, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले की ते वादग्रस्त भूखंडाचा ताबा सोडत आहेत आणि त्यासाठी मिळालेली …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे सात महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना, अहिल्यानगर मधील हरेगांव मळ्याच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार, महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करणार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला भाडेपट्टयाचे मुद्रांक शुल्क माफ, महाराष्ट्र …
Read More »राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार
महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म (एसटी) टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ (Lactation Pods) उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मनोज जरांगे यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य यापूर्वीही आंदोलन केलेय आताही ते आंदोलन करू शकतात
मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आंदोलन केलेली आहेत. यापुढेही ते करू शकतात. त्यांनी दिलेला अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा अर्ज आल्यानंतर पोलिसच त्यावर निर्णय घेतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केली असल्याचे स्पष्ट केले. …
Read More »केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीसन यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ मेटाकडून भारतात प्रतिबंधित वीज गेल्यांनंतर कर्मचाऱ्यांसोबत डान्स करतानाचा एआय व्हिडीओ व्हायरल
केरळमधील अलीकडील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर, व्ही. डी. सतीसन (VD Satheesan) हे केरळ राज्य वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत नृत्य करताना दाखवणारा ‘एआय’ (AI) द्वारे तयार केलेला एक व्हायरल इन्स्टाग्राम व्हिडिओ ‘मेटा’ने (Meta) भारतात प्रतिबंधित केला आहे, अशी माहिती सोमवारी या व्हिडिओच्या निर्मात्यांनी दिली. हा व्हिडिओ गुरुवारी ‘aikavala’ या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात …
Read More »लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्यावर विरोधकांकडून टीकेचा भडिमार लंडनमधील रॉयलस्टोनला दिलेल्या भेटीवरून टीकेला सुरुवात
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या लंडन येथील ‘सिल्व्हरस्टोन सर्किट’च्या भेटीमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यांची ही चार दिवसांची परदेशवारी राज्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर केंद्रित आहे का? एआयएडीएमकेचे (AIADMK) सरचिटणीस एडप्पादी के. पलानीस्वामी आणि भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya