गडचिरोली, धुळे नंतर आज नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टोलेबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »अजित पवारांना अर्थ खाते दिल्यानंतर शिंदे गटाच्या या मंत्र्याने व्यक्त केली प्रतिक्रिया दीपक केसरकर म्हणाले, हे युतीचे सरकार
महाविकास आघाडीचे सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत तेव्हाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना शिंदे गटाचा विरोध पत्करून पुन्हा अर्थ खाते दिले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची काय प्रतिक्रिया …
Read More »शिंदे-फडणवीस-पवार यांच्या राज्य मंत्रिमंडळात ‘हे’ आहेत मंत्री राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
भाजपाप्रणित एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या नव्या राज्य मंत्रिमंडळात खातेबदल करत तिन्ही पक्षाच्या आमदारांना चांगली खाती देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडील खाती काढून घेत ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांना हस्तांतरीत करण्यात आली. तर भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सत्तेच्या साठमारीत मुंबईतली ‘धारावी’ अदानी प्रॉपर्टीजची शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून काल रात्री उशीरा शासन निर्णय जारी
राज्यात एकाबाजूला आगामी निवडणूकीच्यादृष्टीने महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये फूट पाडून स्वतःची सत्ता मजबूत करू पाहणाऱ्या भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने मजबूत कऱण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकिय ड्रामेबाजीच्या गदारोळात मुंबईतील महत्वकांक्षी असलेल्या धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अखेर दुबईच्या सेखलिंक कंपनीऐवजी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, व्याभिचारी तडजोड… आयएएस अधिकारीच म्हणतात तो टेम्पररी मुख्यमंत्री मी परमंट
राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू असताना मनसे प्रमुख राज ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्याचा उल्लेख व्याभिचारी तडजोड असा करत जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा जो राग आहे तो तुमच्या मनातून …
Read More »अंबादास दानवे यांची भन्नाट मागणी, ‘अर्थ’ शिंदेंना द्या! पवारांना `मुख्य` करा रखडलेल्या खाते वाटपावर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपाला सल्ला
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच असाव्या यासाठी अर्थ खात्यावरून चाललेला गोंधळ पाहता अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थखाते द्या आणि हा तिढा सोडवा, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून …
Read More »…राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांनी केली मागणी राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी
राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी …
Read More »जयंत पाटील यांची टीका, नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा
शपथविधी झाल्यानंतर त्याच दिवशी खाते वाटप होतात, असा आतापर्यंतचा प्रघात आहे. मात्र अद्यापही सत्तेत आलेल्या नव्या सहकाऱ्यांचा खातेवाटप झालेला नाही. त्यामुळे नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही असे दिसते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. राज्यात अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर अद्यापही राज्याचा प्रशासकीय कारभार सुरळीतपणे सुरू …
Read More »दस्तुरखुद्द मंत्री आणि सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून एकच शोधः “काही निरोप” घोषणा करणारा मंत्रीच लागलाय यादी-आदेशाची शोधाशोध
राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा …
Read More »अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडले, पण बंगले- दालनांचे वाटप झाले शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्र्यांना घाई
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप रखडले असले तरी मंत्र्यांना मंगळवारी बंगले व दालनांचे मात्र वाटप आज करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला कायम असून अदिती तटकरे …
Read More »
Marathi e-Batmya