महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक …
Read More »पंतप्रधान फसल विमा योजनेचा कालावधी वाढविला आता २०२५-२६ पर्यंत मुदत स्वतंत्र ८२४.७७ कोटी रूपयांचा विमा योजनेसाठी स्वतंत्र निधी
केंद्राने बुधवारी (१ जानेवारी, २०२४) दोन पीक विमा योजना – पीएमएफबीवाय PMFBY आणि आरडब्लूवीसीआयएस RWBCIS – २०२५-२६ पर्यंत आणखी एका वर्षासाठी वाढवल्या आणि फ्लॅगशिप योजनांच्या अंमलबजावणीमध्ये तंत्रज्ञानाच्या अंतर्भावासाठी स्वतंत्र ₹८२४.७७ कोटी निधी देखील तयार केला. पंतप्रधान फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) १५ व्या …
Read More »देशात हायपरलूप रेल्वे धावणार-रेल्वे मार्गही तयार केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
चेन्नईमध्ये ४१०-मीटर लांबीच्या चाचणी ट्रॅकच्या पूर्ततेसह भारताने हायपरलूप वाहतुकीचे आपले स्वप्न साकार करण्याच्या जवळ पोहोचले आहे. थायूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये स्थित, हा प्रकल्प उच्च-गती आणि शाश्वत वाहतूक उपायांच्या दिशेने देशाच्या प्रवासातील एक प्रमुख मैलाचा दगड आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ५ डिसेंबर रोजी एक्स …
Read More »आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय
राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मुंबईच्या एन्ट्री पाँईटवर टोल माफ पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, एसटी बस, शाळा बस, कार यांना टोल माफी
अपेक्षेनुसार आता दसऱ्याचा सण झाल्यानंतर कोणत्याही क्षण विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आता जाहिर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई आणि महानगरात राहणाऱ्या मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर अर्थात टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »भाग-२ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय शासकिय दुःखवटा असूनही निवडणूकीसाठी निर्णयांचा सपाटा
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ निर्णयाचा सपाटाचा लावला असून भविष्काळात राज्य सरकारमध्ये वापसी होते का नाही या विंवचनेत असलेल्या महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या या सुरु असलेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा घेण्यात आली. तसेच विद्यमान राज्य सरकारच्या हिंतसंबधाशी संबधित अनेक निर्णय घेतले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …
Read More »राष्ट्रीय दुःखवटा जाहीर असतानाही राज्य सरकारने घेतली मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय
काल रात्री उशीरा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर देशातील त्यांच्या उद्योगाचा विस्तार आणि त्यांच्या प्रती जनसामान्यांसह उद्योग विश्वात असलेल्या आदराप्रती केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक दिवसाचा दुःखवटा जाहिर केला. हा दुःखवटा जाहिर केल्यानंतर सर्व शासकिय कार्यक्रम रद्द करण्यात येतात आणि पुढे ढकलण्यात …
Read More »ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा’ योजना लागू मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १० लाख ऊसतोड कामगार, …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे आणखी १७ महत्वाचे निर्णय तांड्याबाबत लोकसंख्येची अट शिथील, विविध समुदायासाठी महामंडळे स्थापण्याचा निर्णय
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील विविध जात आणि धार्मिक समुदायांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेण्याचा सपाटा राज्य सरकारने सुरु केला आहे. आज एकूण ३३ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यापैकी १७ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती खालील प्रमाणे आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजूरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला (PM-RKVY) मंजुरी दिली, ज्याचे उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि कृषोन्नती योजनेला (KY) स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा प्राप्त करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या एकत्रित प्रस्तावित खर्चासह आहे. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दोन योजना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देतील ज्यात …
Read More »
Marathi e-Batmya