राज्यात नव्याने भाजपा प्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्याचे नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकाऱ्यालाही १ रूपये कोणी देत नाही तेवढ्या पैशात पीक विमा देत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दोनच महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेत बदल करत १ रूपयात पीक योजना बंद केली. तसेच …
Read More »महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीरः ईव्ही घ्या मिळवा टोल दरात ५० टक्के सूट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आणि धोरण जाहिर
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे धोरण २०३० पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा येत्या पाच वर्षांसाठी १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास …
Read More »मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मिती वितरण धोरणात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त सदनिकांचे उपलब्ध व्हाव्यात यासाठीच्या आणि त्यांच्या वितरणाच्या सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयाच्या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाच्या यापुर्वीच्या १९ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा व स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात येणार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय सावित्रीबाई फुले स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद, गोसीखुर्दसाठी २५ हजार कोटी रूपयांची तरतूद, कामगार संहिता
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जवळपास ८ निर्णय घेण्यात आले. या बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या गोसीखुर्द धरणाच्या ऱखडलेल्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी रूपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार संहिता नियमास मान्यताही देण्यात आली. विभागीय …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेतले
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधी निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजनेबाबत निर्णय घेत आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदवाढ देणे, आणि महत्वाचा म्हणजे झोपडपट्टी घोषित झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव ६० दिवसांत द्यावा लागणार आदी निर्णय …
Read More »म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन, आदर्श नगर येथील इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात …
Read More »राज्य सरकारचा मोठा निर्णयः घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, डेपो पद्धती ऐवजी लिलाव पद्धतीने विक्री
विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह आज राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पुढ़े नदी,खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलावपद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा …
Read More »नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास मंजूरी
अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याबरोबरच वडसा-देसाईगंज- गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधी, बीड जिल्ह्यातील ब्रम्हनाथ येळंब आणि टाकळगांव हिंगणी, निमगांव, येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास मंजूरी आणि यासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ …
Read More »प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठी मार्वल शासकीय कंपनीसाठी समिती स्थापन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर व्हावा यासाठी मार्वल या शासकीय कंपनीच्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्य पोलीस दलातील कृत्रिम बृद्धीमत्तेच्या वापरासाठी महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोर्समेंट …
Read More »
Marathi e-Batmya