महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले कृषी विभागाकडून अधिसूचना जारी

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार, अधिनियमांतर्गत कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी कृषी अधिकारी (विस्तार) यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्षेत्रासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची अपील अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद’ स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. उपमुख्यमंत्री, कृषी, महिला व बालविकास, ग्रामविकास, सहकार, पशुसंवर्धन, वित्त, वन, महसूल, नगरविकास आदी विभागांचे मंत्री सदस्य असतील, तर कृषी विभागाचे सचिव सदस्य-सचिव असतील.

या निर्णयामुळे महिला शेतकऱ्यांशी संबंधित अधिकार व कार्यवाही स्थानिक स्तरावर सुलभ होण्यास तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण प्रशासकीय व्यवस्था आहे.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *