Tag Archives: chief minister

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे नवी मुंबईतील मराठी साहित्य भवन व मुंबई शहरातील विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, लोकसभेला लोकांनीच ठासून सांगितलंय की शिवसेना… असली नकलीच्या वादावर लोकांनीच निर्णय दिलाय

दसरा सणानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सीसीएमटी समोरील आझाद मैदानावर पार पडला. या दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि सांगितल्या प्रमाणे एकमेकांची उणी दुणी काढली जातील असे भाकित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले जर आम्ही उठाव …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, महाप्रितने परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता… महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या मंडळाची बैठक संपन्न

हात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. महाप्रितच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित – महाप्रीत संचालक मंडळाची …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, वायुदलाचे विमान उडवून केवळ वायुदलाचा वेळ… महाराष्ट्रात हरतायेत म्हणून महामंडळ आणि विविध निर्णय

‘बेकायदेशीर सीएम शिंदे आणि राजवटीने आज भारतीय हवाई दलाचे सी-२९५ विमान नवी मुंबई विमानतळावर उतरवले. हे विमान कच्च्या आणि लहान धावपट्टीवरदेखील उतरू शकते. विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. अजूनही विमानतळ पूर्णपणे तयार नाही . ही स्टंटबाजी थांबलीच पाहिजे, कारण यामुळे भारतीय हवाई दलाचा वेळ आणि करदात्यांच्या पैशाचा खर्च होत आहे. हवाई …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगांराना वाढीव सानुग्रह अनुदान ४१० कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या विकास कामांचे भूमिपूजन

नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून २५ नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, १० बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा …

Read More »

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी – २९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा-शिंदे सरकारची अदानीला दसरा दिवाळीची भेट बोरिवलीतील भूखंडही अदानीच्या घशात

भारतीय जनता पक्ष शिंदे सरकारची निरोपाची वेळ आली तरी त्यांची मुंबई लुटण्याची भूक काही संपत नाहीत. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई विकण्याचा सपाटा सुरुच आहे. मुंबईचा पर्यावरणीय समतोल रहावा यासाठी काँग्रेस सरकारने मुंबईत ना विकास क्षेत्र (NDZ ) निश्चित केली होती त्यातील मढ आयलंडची जमिनही भाजपा सरकारने अदानीला देण्याचा घाट घातला …

Read More »

जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांना आणखी चार आमदारांचा पाठिंबा नॅशनल कॉन्फरन्सच्या विधिमंडळ पक्षनेते पदी ओमर अब्दुल्ला यांची निवड

जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला घवघवीत यश मिळाले. तसेच पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी ओमर अब्दुल्ला यांची निवडही करण्यात आली. विधानसभा निवडणूकीत एकट्या नॅशनल कॉन्फरन्सला ४२ जागा मिळाल्या आहेत. त्यातच जम्मू काश्मीरमधील चार अपक्ष आमदारांनी ओमर अब्दुल्ला यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे संख्याबर ४६ वर पोहोचले …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाची उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली, भारतरत्न देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला यश नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे

राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी करत याभागात भिती आणि दहशतीवर …

Read More »