मुंबई : प्रतिनिधी नागपूर मुंबईला जोडणाऱ्या समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या मुर्हुर्तास दिवसेंदिवस उशीर होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ३६ हजार कोटीं रूपयांवरून या प्रकल्पाची किंमत ५६ हजार कोटी रूपयांवर पोहोचली आहे. मध्यंतरीच्या काळात ४९ हजार कोटींवर अंतिम करण्यात आला. मात्र ६ महिन्यातच यात पुन्हा सहा …
Read More »भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षापासून राज्याच्या सत्तेत विराजमान असूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये सातत्याने कलगीतुरा सुरुच आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या अटकळी सातत्याने बांधण्यात येत होत्या.मात्र भाजपबरोबरील सत्तेतून आम्ही बाहेर पडणार नाही, पण सत्तेत राहून राज्यातील जनतेच्या हिताची कामे करू अशी स्पष्टोक्ती दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …
Read More »केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे २७ लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द
मुंबई : प्रतिनिधी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग,चहल सिंग,प्रेमज्योतसिंग चहल,अमरीक सिंग वासरीकर,शेरसिंग फौजी,गुरूंदर सिंग बावा,एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त …
Read More »…आणि रामदास आठवलेंनी दिलेला शब्द पाळला महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती
सोलापूर : प्रतिनिधी मागील एक आठवड्यापूर्वी सोलापूर येथील जाहीर कार्यक्रमात रिपाई (ए) चे पदाधिकारी राजा सरवदे यांना मंत्रीपद दिल्याशिवाय सोलापूरात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्यास एक महिन्याचाही कालावधी लोटत नाही, तोच सोलापूरकरांना दिलेला शब्द खरा करून दाखविल्याने दलित चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना …
Read More »पक्षाचे नेते आले म्हणून अनेकांना प्रश्न सुचत होते अजित पवारांचा शिवसेनेला आदीत्य ठाकरेंवरून चिमटा
नागपूरः प्रतिनिधी तब्बल तीन दशकानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरात होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा कामकाज पाहण्यासाठी आणि त्यांचा आक्रमकपणा बघण्यासाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी आज विधानसभेत हजेरी लावत काही काळ सभापतींच्या गँलरीत बसून कामकाज पाहिले. नेमका हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी काही पक्षाचे युवा …
Read More »दूधदरवाढीच्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूरः प्रतिनिधी राज्यातील दूधाला चांगला दर मिळावा आणि प्रतिलिटर दूधापोटी ५ रूपयांचे अनुदान शेतकऱ्याला मिळावे यासाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात खरोखरच शेतकरी सहभागी असतील तर त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून विरोधकांचे रणकंदन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब: राजदंड पळविला
नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करून त्याऐवजी त्यांच्या तलवारीची उंची वाढविण्याची योजना राज्य सरकारची असल्याची सत्य माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यामुळे पुतळ्याची उंची कमी करण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला नसल्याचा टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत याप्रकरणी सरकारने …
Read More »विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे यादी प्रसिध्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत देत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
नागपूर : प्रतिनिधी मागील अधिवेशनात घोषणा करूनही राज्यातील बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच याप्रश्नी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार रात्री १२.३० वाजेपर्यंत विधानसभा रोखून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज …
Read More »आदीवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील कारवाईचे विधानसभेत पडसाद बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन
नागपूर : प्रतिनिधी आदीवासी मुलांच्या वसतिगृहात चांगल्या दर्जाचे जेवण व नाष्टा मिळत नाही. त्यामुळे जेवण-नाष्टाचे पैसे डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ पुणे ते नाशिक दरम्यान आदीवासी मुलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शांततेत असूनही मुलांच्यांवर पोलिसांनी दबाव आणत कारवाई केल्याच्या मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, विरोधी …
Read More »खडसे साहेब, शिकार कोण करतंय आणि ताव कोण मारतयं अजित पवारांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण तर मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका
नागपूर : प्रतिनिधी राज्यात आमचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल, गँस यासारख्या वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवून महागाई रोखण्याचा प्रयत्न करत. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. खडसे साहेब तुम्ही इकडे किती तावातावाने आमच्यावर विरोधात भूमिका मांडत होतात. आता तुम्हालाच तिकडे गेल्यावर बाजूला बसवून नको त्या लोकांना पुढे …
Read More »
Marathi e-Batmya