दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …
Read More »महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …
Read More »बाबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर महाराष्ट्रासह देशातील लाखो आंबेडकरी अनुयायांची हजेरी
मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम मागासवर्गीयांच्या ७० हून अधिक पिढ्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत आणि स्वाभिमानाचे अंकुर फुलविणाऱे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटल्याचे चित्र चैत्यभूमी आणि दादर परिसरात पाह्यला मिळाले. काल रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनुयांयाबरोबरच देशातील झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर सरकार दिशाभूल करत असल्याचा प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल …
Read More »मानव-वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवे धोरण धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य वन्यजीव मंडळाची १४ वी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार प्रभूदास …
Read More »भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …
Read More »६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करण्याचे भीम आर्मीचे आवाहन अन्यथा महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम आंबेडकर अनुयायांचे श्रध्दास्थान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आणि त्यांचे राहते घर दादर परिसरात आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकास डॉ.आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली असून स्थानकाचे नामांतर ६ डिसेंबरपूर्वी करावे अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही …
Read More »उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्तुतीसुमने
वाशिमः प्रतिनिधी राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून शिवसेनेला मिन्नतवाऱ्या करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने भविष्यात भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. …
Read More »दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा प्रत्यारोपनाला आर्थिक मदत देणार दिव्यांग व्यक्तींच्या २०१८ धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची मंत्री बडोले यांची माहिती
मुंबई :प्रतिनिधी दिव्यांगत्वावर सुरूवातीच्या काळातच प्रतिबंध करता यावा यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया अथवा प्रत्यारोपण करता यावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधीतून राज्याकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली असून हिमोफिलिया आणि थालसिमिया या आजारांवरील उपचाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रूग्णालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण करणार असल्याची …
Read More »अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …
Read More »
Marathi e-Batmya