मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या नव्या आराखड्याला अद्यापही तांत्रिक समितीची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणारे स्मारकाचे काम आणखी अधिक काळासाठी रखडण्याची शक्यता निर्माण झाली. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या सस्मारकाचे काम ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. स्मारकाचा मूळ आराखडा ३ हजार …
Read More »मंत्रालय लोकशाही दिनात महसूल आणि नगरविकास तक्रारीत अव्वल माहिती अधिकारात उघडकीस
मुंबईः प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे ‘लोकशाही दिन’ होय. हा ‘लोकशाही दिन’ जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. ११० वा मंत्रालय लोकशाही दिन संपन्न झाला असून १५०५ स्वीकृत अर्जावर सुनावणी घेण्यात आली. सरासरी १३ अर्ज लोकशाही दिनी मुख्यमंत्री यांच्या …
Read More »तयारीला लागा, पण कामे पूर्ण करा आढावा बैठकानंतर मुख्यमंत्र्यांचे भाजपच्या मंत्र्यांना पत्र
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारला साडे चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यातच एकाबाजूला जनतेमध्ये राज्य सरकारच्या विरोधात नाराजी पसरत आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्राच्या दुटप्पी धोरणामुळे वाढत्या महागाईला आळा घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूकीसोबत राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जायचे की स्वतंत्ररित्या जायचे याबाबत भाजपच्या वरिष्ठ …
Read More »अहो अधिकाऱ्यांनो कामे करा नाहीतर मंत्र्यांना लोक शिव्या घालतील पीए, ओएसडींची जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना विनंत्या
मुंबईः प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारला ४ वर्षे पूर्ण झालेली असून डिसेंबर ते मार्च दरम्यान लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीच्या सोबतच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने सर्वच मंत्र्यांच्या पीए, ओएसडी आणि खाजगी सचिवांकडून मंत्र्याकडे गाऱ्हाणी घेवून येणाऱ्या लोकांची कामे करावीत यासाठी त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ …
Read More »पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त केंद्र व राज्य सरकारचा राज्यातील जनतेला दिलासा
पेट्रोलच्या सततच्या वाढत्या दरामुळे संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात रोष वाढत होता. तसेच जनताही त्रस्त झाली होती. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रानेही पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे राज्यातील पेट्रोलच्या प्रति …
Read More »डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
मुंबईः प्रतिनिधी हे राज्य बाबासाहेबांच्या विचारांप्रती कटिबध्द असलेले राज्य आहे.त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. डॉ.बाबासाहेब …
Read More »आता व्यापाऱ्यांना एकाच राज्यात अनेक दाखले काढता येणार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी
मुंबईः प्रतिनिधी सद्यस्थितीत व्यापार-धंद्यांसाठी एका राज्यात एकच नोंदणी दाखला घेता येत असे. मात्र जीएसटी नोंदणी दाखल्याच्या तरतूदीत सुधारणा करत व्यापाऱ्यांना आता एकाच राज्यात वेगवेगळ्या व्यापार-धंद्यांसाठी वेगवेगळे नोंदणी दाखले घेता येणे शक्य होणार असून या अदिनियमातील सुधारणेस राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. याबरोबरच मूळ स्त्रोतातून कर गोळा करण्यास (टीडीएस) पात्र …
Read More »भाजपामधील एकाधिकारशाहीच्या विरोधात आमदार डॉ. देशमुखांचा राजीनामा पक्षांतर्गत असलेली धुसफूसीमुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या तयारीत
मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत आपले राजकिय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आयाराम रांगेत आहेत. मात्र भाजपमधील पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमधून बाहेर पडणाऱ्यांची सुरुवात झाली असून भाजपचे नागपूर जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी आपल्या आमदाराकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे आज दिला. लवकरच …
Read More »म.गांधींच्या जयंती दिनीच मंत्रालयात स्वच्छतेचे तीन तेरा लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची दुरावस्था
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन स्वच्छता दिवस म्हणून पाळण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु मंत्रालयातील स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्वच्छतेचीच दुरावस्था झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालविला जातो. …
Read More »संभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या ! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर उपरोधिक टीका
मुंबई : प्रतिनिधी संभाजी भिडेंवर सरकारचा विशेष स्नेह वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना थेट महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील …
Read More »
Marathi e-Batmya