मुंबई : प्रतिनिधी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिक रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात उभे राहीले आहेत. बहिष्काराच्या भीतीपोटी राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी जमिन संपादनाची ती अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय जाहीर सभेत केला. मात्र त्यात्र त्यास काही तासांचा अवधी उलटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती अधिसूचना …
Read More »पैशाची मस्ती इथे चालणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
नाणार : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत सगळेच जण शिवसेनेची भूमिका काय विचारतात. त्या सर्वांना सांगतो की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून हा प्रकल्प तरीही इथे आला तर त्याची राख करू असा सज्जड दम राज्य आणि केंद्र सरकारला दिला. पैशाच्या बळावर येतील शेतकऱ्यांची जमिन खरेदी करून सौदी अरेबियाच्या …
Read More »बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा विजेत्यास २५ हजाराचे बक्षीस मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा …
Read More »बीकेसीच्या धर्तीवरील कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीत भूमिपुत्रांना भागीदारी पायाभूत विकासासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येणार असून स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »भविष्यकाळातील कोणत्याही निवडणूकीत भाजपा-शिवसेना युती नाहीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबरील युती कायम रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्धार कायम असतानाच यापुढे भविष्यातील कोणत्याही निवडणूकीत युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेने दरम्यान युती होणार नसल्याचे यानिमित्ताने …
Read More »७ लाख शिकाऊ उमेदवारांना उद्योजकांनी संधी द्यावी उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीप अर्थात शिकावू कामगारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाख शिकावू उमेदवारांना संधी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तसेच ७ लाख शिकावू उमेदवारांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता …
Read More »मुख्यमंत्री खोटारडे…म्हणे महाराष्ट्र हागणदारी मुक्त फडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
नांदेड : प्रतिनिधी राज्य हागणदारीमुक्त झाले आहे, असा नविन दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, ग्रामीण भागात जाऊन त्यांनी स्वतः परिस्थिती पाहावी, फडणवीस म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या …
Read More »महाराष्ट्राला १५ पंतप्रधान पुरस्कार ११ वर्षात ८ योजनांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळाले
नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या …
Read More »मुंबईतल्या हागणदारीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचा काढता पाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत राज्यात २२ लाख शौचालये बांधण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र हे देशातील हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु मुंबईसह महानगर प्रदेशात हागदारीचा प्रश्न गंभीर असल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार …
Read More »विना अनुदानित शाळांच्या ८ हजार ७९० शिक्षकांना पगार मिळणार ६५ कोटी रूपयांच्या निधी वाटपास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने जुलै २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या शाळांमधील ८ हजार ७९० शिक्षक व शिक्षकेत्तर पदांसाठी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ अशा १२ …
Read More »
Marathi e-Batmya