अभिजीत दीपके यांची माहिती, पोलिसांनी परवानगी नाकारली, शांततेत जेलभरो आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

कॉकरोच जनता पार्टीच प्रमुख संयोजक तथा संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर वरील समाज माध्यमावरील प्रोफाईलवरून माहिती देताना 2 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यास मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली आहे. परंतु 2 ऑक्टोंबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने शांततेत जेलभरो आंदोलन करणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याच्या माहितीनंतर पार्टीच्या अनेकांकडून दिल्लीच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे झेन जी ने मुंबईत आंदोलनासाठी यावे असे आवाहनही यावेळी केली.

पुढे बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, मुंबईतल्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली आहे. तरीही आम्ही शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंदोलनाच्या दिवशी शांततेत जेलभरो आंदोलन करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

मुंबईत कॉकरोच जनता पार्टीबरोबरच इतर संघटनांकडूनही आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत विचारले असता अभिजीत दीपके म्हणाले की, लोकशाही आणि राज्यघटना मानणाऱ्या ज्या काही संघटना आणि राजकिय पक्ष असतील ते सर्वजण देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आपापल्या पद्धतीने आंदोलन करत-करणार आहेत. त्यामुळे सर्वांच्याच आंदोलनाच्या दबाव मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर वाढेल असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, 2 ऑक्टोंबरच्या सीजेपीच्या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबाच दिला असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

Ujjain Shahi Masjid : शाही मशिदीचा काही भाग पाडण्यावरून उज्जैनमध्ये गोंधळ दगडफेकीदरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा

उज्जैन :  मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सोमवारी सकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ऐतिहासिक शाही मशिदीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *