राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची …
Read More »मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात
काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त …
Read More »त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान …
Read More »भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील वेळापत्रक राहणार असे
जवळपास एक महिन्याहून अधिक काळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यांत्रा कन्याकुमारी, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणानंतर आता ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवेश करत आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अर्थात जवळपास १४ दिवस …
Read More »कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करा
राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पीके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांमध्ये थोडासा कापूस आणि भाताचे पीक शेतक-यांनी मोठ्या कष्टाने वाचवले आहे. पण सरकारी खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे खासगी …
Read More »नाना पटोले यांची टीका, हे तर गुजरातचे एजंट …. मुंबईही गुजरातला देऊन टाकतील
महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन …
Read More »काँग्रेसची मागणी, आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी करा गुवाहाटीला जाण्यासाठी कोणी किती खोके घेतले हे जनतेसमोर आले पाहिजे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …
Read More »नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न …
Read More »केजरीवाल आणि भाजपाच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका, आधी रूपया सांभाळा
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तसेच तब्बल दोन वर्षानंतर कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. मात्र राजकिय क्षेत्रात कधी कधी बेताल वक्तव्ये करून खळबळ माजवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली. तसेच नोटांवर महात्मा …
Read More »काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताना खर्गे म्हणाले, एका कामगाराचा मुलगा…
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा पराभव करत विजय मिळविला. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आवर्जून उपस्थित होते. याशिवाय अनेक नेते आणि कार्यकर्त्येही या कार्यक्रमास हजर होते. …
Read More »
Marathi e-Batmya