Tag Archives: congress

काँग्रेस म्हणते, मोदी लाट ? आता देशात महागाई, निराशा व चिंतेची लाट दिल्लीतील रामलीला मैदानावर ४ सप्टेंबरला महागाई विरोधात काँग्रेसची महारॅली

देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅससह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. जनता महागाईने त्रस्त झाली असताना मोदी सरकार मात्र या मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना …

Read More »

नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा, चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये… श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या सल्ल्याचा सांगितला किस्सा

मागील काही दिवसांमध्ये दिल्लीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पध्दतशीर पंख छाटण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता महाराष्ट्रातून गडकरी यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनुषंगाने एक किस्सा सांगत व्यासंगी राजकारणी श्रीकांत जिचकर यांच्या सल्ल्यानंतर काय …

Read More »

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; एका महिन्यानंतर निवडणूक ‘या’ तारखेला मतमोजणी ज्येष्ठ नेत्यांनी केले जाहीर

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून आणि निवडणूकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णय प्रक्रियेवर पक्षातंर्गत काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच पक्षातील २३ नेत्यांनी वेगळी भूमिका स्विकारल्यानंतर त्यातील काही जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता पण ते… ... तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार - एकनाथ खडसे

एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक …

Read More »

आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अध्यक्ष कळसुत्री बाहुला नसाला पक्षानं आत्मपरिक्षण करावे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीला राहुल गांधीच जबाबदार असल्याची टीका करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावे, असे …

Read More »

भाजपाचा सवाल, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

एकाबाजूला शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकटे पडत असल्याचे दिसत असतानाच आज संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेशी युती करत असल्याचे उध्दव ठाकरे यांची …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मंत्री सत्तार, आ. बोरनारे यांना शिंदे-फडणवीस पाठीशी घालणार का ? टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे

टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा गैरमार्गाचा लाभ झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा हात सोडलाः राजीनाम्याचे पत्र वाचले का? राहुल गांधी अपरिपक्व नेते असल्याचा आरोप

मागील महिन्यापासून काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्वावरून निर्माण झालेल्या प्रश्नावरून उभे तट पडले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षाची वाट धरली. त्यानंतर आज ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यासंदर्भात आझाद यांनी सोनिया …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले; असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणे कधीही चांगले… पोलिसांना १५ लाखात घर, ७५ हजार जागांसाठी भरती

विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. तसेच फार मुख्यमंत्री राहणार नसल्याचे भाकितही विरोधकांकडून करण्यात आले. या टीकेचा धागा पकडत मुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या

राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही, शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला …

Read More »