Tag Archives: devendra fadnavis

विजय वडेट्टीवार यांची टीका, सरकारचे परीक्षार्थींना सबुरीचे गाजर

राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडल्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी” चे गाजरच असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका,…इतकं फस्ट्रेशन बरे नव्हे, फोटो मॉर्फ केलेला

मकाऊ येथील एका रेस्टॉरंटमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा एक फोटो शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपण मकाऊमध्येच कॅसिनो आणि रेस्टॉरंट एकाच ठिकाणी असल्याचे सांगत मी कधीही जुगार कधी खेळलो नाही आणि कुटुंबासमवेत असल्याचे …

Read More »

दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना

वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांसाठी घेतले हे निर्णय

कालपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या. त्या फैरी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती. या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत काय चर्चा झाली याची माहिती पुढे येऊ शकली …

Read More »

राज्याच्या १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत. हे सादरीकरण मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. राज्याच्या जीडीपी (विकास दर) १७ टक्के साध्य करणे, फॅब आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला गती …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, आणि संपली की…

निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या खात्याचे कौतुक

पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या आणण्यात- मदत देण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर आहेत. मागील ३ मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नसून यावर्षी केवळ ६५.८८ कोटी जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विदर्भातील सिंचन कामांना मान्यता देत आयुर्वेद-युनानी महाविद्यालयातील अध्यापकांची पदे भरणे, आश्रमशाळांमधील गणित विज्ञान विषयाशी संबधित शिक्षकांच्या जागा भरणे, संत्रा उद्योग उभारणी, बारामती येथे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणे, मॉरिशस येथे पर्यटन केंद्र उभारणी, राज्यात गोवंशीय प्रजनन कायदा लागू करण्याचा निर्णय आणि वस्त्रोद्योग उभारणीच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवा

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री …

Read More »