Tag Archives: devendra fadnavis

शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदेतील संख्याही घटविली महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरविला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपली राजकिय ताकद वाढण्यास मदत होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकार जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

उध्दव ठाकरेंचा निर्णय फिरवत शिंदे सरकारने महापालिका नगरसेवकांची संख्या घटविली मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या कमी होणार

तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवित २०१७ साली झालेल्या निवडणूकांमध्ये असलेल्या जागा इतकीच सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय भिवंडी-कल्याण शीळ फाटा रस्त्यासह, वर्धा बॅरेज, लेंडी प्रकल्प यासह अन्यचा समावेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. मात्र या याचिकेवर आज कोणताही ठोस निर्णय न्यायालयाने दिला नाही. त्यामुळे दुपारी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उपस्थित झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे… भिवंडी कल्याण शीळ …

Read More »

अजित पवार यांचा हसत खोचक टोला, रिकाम्या खुर्च्याही या दोघांकडे… मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला टोला

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येवून एक महिना झाला. तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेची घोषणा, अण्णाभाऊ साठेंचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी पाठविणार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, या समाजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चेंबूर येथील फाईन आर्टस् …

Read More »

अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथे उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री …

Read More »

नव्या सरकार मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या गाड्यांच्या पेट्रोल-डिझेलचे झाले वांदे पैसेच मिळेनासे झाल्याने १५ दिवसाहून १४ गाड्या बंद

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होवून एक महिना झाला. मात्र राज्याचा गाडा चालविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारच न झाल्याने या सरकारच्या प्रसिध्दीचे काम पाहणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाला आवश्यक तो निधी मिळेनासा झाला. त्यामुळे या विभागाच्या गाड्यांचे पेट्रोल-डिझेलचेही वांदे होवू लागल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, ते वक्तव्य त्यांचं.. त्याशी आम्ही सहमत नाही

मुंबई आणि ठाणे येथील गुजराती आणि राजस्थानी बाबत मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जाबाबतही वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करत एकच खळबळ उडवून दिली. त्याचे पडसादही राज्याच्या राजकिय वर्तुळात पडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारच मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई …

Read More »

भाजपा आमदारच म्हणाले, तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांचा तो निर्णय रद्द करा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढवलेली सदस्य संख्या रद्द करा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेले तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला तो निर्णय रद्द करण्याची मागणी भाजपाच्या आमदाराने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली. यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.बावनकुळे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ईडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ नाही अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्री, मुख्य सचिव व राज्यपालांना सादर करणार

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशेने पहात आहे परंतु राज्यात झोपे गेलेले, आंधळे, बहिरे ईडी सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही म्हणून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी …

Read More »