Tag Archives: eknath shinde

अतुल लोंढे यांचा आरोप, बारसू भागात शिंदे-फडणवीसांचा ‘रावणराज’ महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसमध्ये..

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे रावणराज आहे. महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसला गेले असून दोघांची अवस्था ही बादशाह-ए-बेखबर अशी आहे, असा घणाघाती …

Read More »

निवृत्त होण्याआधीच मुख्य सचिवांची इतर ठिकाणी सोय, तर नव्या मुख्य सचिवांना पीडब्लुडीचा भलताच सोस राज्य सरकार सर्वसामान्यांचे की फक्त निवृत्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठीचे

३० एप्रिल २०२३ रोजी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तर हे सेवानिवृत्त होत आहेत. मात्र तत्पूर्वीच मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास सत्कार करत निवृत्त होण्याआधीच अनौपचारिक त्यांना निरोप दिला. तर मनुकुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस सुट्टीच्या दिवशी येत असल्याने आज शुक्रवारी …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, जनतेची डोकी फोडून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा… सरकारने बारसुजवळची जमीन परप्रांतीय व जवळच्या लोकांना कमी भावाने मिळवून दिली

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास …

Read More »

महाराष्ट्रात ‘या’ सात ठिकाणी नव्या एफएम केंद्राचे उद्घाटन देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. “डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा १ मे, महाराष्ट्र दिनी होण्यासाठी प्रयत्न करा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे राज्य सरकारला पत्र

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्र दिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य …

Read More »

१ मे ला विद्यार्थी संघटना उच्च शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यासमोर करणार अर्धनग्न भीकमागो आंदोलन ३८ दिवस झाले विद्यार्थी संघटना करतेय आंदोलन पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना यांना वेळेच मिळेना

मुंबईतील शासकिय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी कालबाह्य नियुक्तीसह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून नियमबाह्य वर्तन आणि १२ विभागीय सहसंचालकांकडील कारभार काढून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासनाने दिलेले असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप काढून न घेतल्याने कॉप्स या विद्यार्थी संघटनेकडून मागील ३८ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच संघटनेकडून रितसर मागण्याचे …

Read More »

महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात याचिका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि सीबीआय चौकशीची उच्च न्यायालयात मागणी

१६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास १० लाख श्री सेवक उपस्थित होते. या श्री सेवकांना सुमारे सात-आठ तास उन्हात बसवून ठेवल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणावरून …

Read More »

राज्य सरकारच्या ‘या’ विभागात निवड झालेल्या २ हजार उमेदवारांना मिळणार नियुक्ती पत्रे महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

राज्य सरकार च्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे …

Read More »

अजित पवार यांचा इशारा, दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका; तात्काळ स्थगित करा खारघर घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या

बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला दिला. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार मदतः पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. …

Read More »