“आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज घेतले. …
Read More »आदित्य ठाकरेंची खोचक टीका, अर्थसंकल्प पालिकेचा की वर्षावरील कंत्राटदारांचा हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण कोणतीही करवाढ नसणारा आणि शिलकी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला …
Read More »जाणून घ्या पालिकेने काय दिले अर्थसंकल्पातून मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करवाढ न करता मात्र शिक्षणावरील खर्चात कपात करत मुंबईकरांसाठी अर्थसंकल्प
मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांची मुदत संपलेली आली असून साधारणतः एप्रिल-मे दरम्यान या निवडणूका कधीही जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी कोणत्याही पध्दतीची दरवाढ नको मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही नव्या बाबींची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. त्यानुसार आज …
Read More »भाग-१: मुख्यमंत्री शिंदेच्या अध्यक्षतेखालील सरकारी संस्थेचा सर्वसामान्यांच्या नावावर सदनिका घोटाळा सॅटेलाईट सर्व्हेमध्ये नसलेले प्रकल्पबाधित दाखवित १३५ बोगस बाधितांना दलालांच्या मध्यस्थीने सदनिका वाटप
राज्यात भाजपाच्या मदतीने जनतेच्या मनातील सरकार आणि सर्वसामान्यांचे सरकार असल्याची घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र मागील ८ वर्षापासून नगरविकास विभागाचा कारभार सांभाळणारे आणि मागील ७ महिन्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प-६ मधील प्रकल्पबाधितांच्या नावाखाली सर्वसामान्याच्या नावाखाली …
Read More »बच्चू कडू यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? मला मंत्रिपद द्या असे म्हणणार नाही पण विस्तार करा
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. अखेर राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवातीला दिवाळीनंतर असे जाहिर केले त्यानंतर हिवाळी …
Read More »अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान
महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती
वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर बोलताना साहित्यिक आणि साहित्य संमेलनाध्यक्षांना सुखावणारी घोषणा केली असून यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. तसेच मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या …
Read More »मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा
बीज गुणन केंद्र इसारवाडी या औरंगाबाद येथील प्रक्षेत्राचे फळ रोपवाटिकेत रूपांतर करून सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स २२.५० हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स पैठणच्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे मुंबई महापालिकेला आदेश, अर्थसंकल्पात या गोष्टींचा समावेश करा दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत
मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले …
Read More »निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदा जाहिर झालेल्या उमेदवाराची पहिली विजयी सलामी कोकण शिक्षक मतदार संघ शेकापकडून हिसकावून घेत भाजपा-शिंदे गटाने राखली
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी ३१ जानेवारी रोजी मतदान झाले. तसेच २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता कोकणमधील शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडी-शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाने उमेदवारी दिली नाही म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत …
Read More »
Marathi e-Batmya