Tag Archives: minister

राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार उमेदवारांना रोजगार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात …

Read More »

माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार

“माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण द्यावे”, असे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. शिक्षण विभागातील माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांच्या समस्या व शिक्षक भरतीमध्ये …

Read More »

मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार

नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात मुंबईतील जलवाहतूक यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी बंदरे विभागाचे …

Read More »

अजित पवारांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री देसाई प्रत्युत्तर म्हणाले, मग ती बेईमानी नव्हती?

सध्या शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, ज्या घरात वाढलो त्याच घराला उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेवर …

Read More »

सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला, मी जर तीन महिन्याचं बाळ तर…

मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, एअरबस प्रकल्पासाठी रतन टाटांना पत्र लिहिले…

सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा …

Read More »

कौशल्य विद्यापीठाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटीचे शिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर २०२२ पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

आनंदाचा शिधाचे वितरण आता ऑफलाईन पध्दतीने अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ …

Read More »

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ योजनेचा २० ऑक्टो.पासून शुभारंभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबर, २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. सुमारे …

Read More »

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या जमिनी थेट गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. तर काही जणांकडून जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमिन लाटण्याचे प्रकारही सध्या सुरु झाले आहे. अशीच एक २१० एकर जमिन हडपण्याचा …

Read More »