Tag Archives: minister

भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ चा सहभाग महत्त्वाचा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन

सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. त्यात या क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे …

Read More »

….. तर हसन मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. वास्तविक पाहता या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. या अनुषंगाने मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनीटसुद्धा ठेवू नये असे सांगतानाच सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन …

Read More »

जळगांव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

जळगांव जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश …

Read More »

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री महाजन …

Read More »

गणेशमूर्ती हा लाखो हिंदूंच्या अस्थेचा विषय, मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा …

Read More »

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची …

Read More »

धनगर आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडाऱ्याची उधळण भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच- विखे पाटील यांची संयमाची भूमिका

मराठा समाजाला कुणबी समाजाचे आरक्षण देण्याचा मुद्दा गाजत असतानाच राज्याचे महसूलमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज सोलपुरात धनगर समाजाच्या आरक्षणावरून या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने विखे पाटील यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावर भंडारा टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सुरक्षा यंत्रणेत …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होवून दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून ४ लाख रुपये असे प्रत्येकी ५ लाख …

Read More »

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व घटकांनी एकत्र राहण्याची आवश्यकता कुंभार समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द - मंत्री छगन भुजबळ

कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढं आल पाहिजे. ओबीसींना आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन …

Read More »