मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त …
Read More »महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर
महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० …
Read More »उदय सामंत यांची माहिती, मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप ५७ लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध
मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जात पडताळणीसाठी प्राप्त २१ हजार ५१ अर्जांपैकी १६ हजार ११० प्रकरणांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात …
Read More »शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी …
Read More »महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची राज्य सरकारकडून घोषणा राज्य सरकारने निवडणूक रद्दबातल ठरवित भाजपा समर्थक सदस्यांची नियुक्ती
सरकारला अपेक्षित असलेले पॅनल निवडणून न आल्याने वैयकीय परिषदेची झालेली निवडणूकच रद्दबातल ठरविण्याचा पराक्रम सरकारने केला. आणि सरकारने यासंदर्भात नव्याने सदस्यांची नियुक्तीची घोषणा करेल असे राज्य सरकारच्या वतीने जाहिर करण्यात आले. त्यानुसार आज अखेर राज्य सरकारने त्यांना हव्या असलेल्या भाजपा समर्थक १४ सदस्यांच्या निवडीची घोषणा राज्य सरकारने केली. विशेष म्हणजे …
Read More »दिल्लीत महाराष्ट्र, कृषी विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा केंद्राकडून गौरव; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत महाराष्ट्राने (कृषी विभाग) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या वतीने दि.२४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित पीएमएफएमई कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राला …
Read More »आदिती तटकरे यांची माहिती, लेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात
मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आदिती तटकरे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले
राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे …
Read More »आशिष शेलार यांचे निर्देश, मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारणीसाठी आराखडा तयार करा मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग
देशातील ऐतिहासिक तंतुवाद्य निर्मिती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी मिरज येथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग आणि संबंधित …
Read More »
Marathi e-Batmya