Tag Archives: minister

मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाले विखे-पाटील म्हणाले.., हैद्राबाद गॅझेटिअर अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा

मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिंदे समितीच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हैद्राबाद गॅझेटिअर आणि सातारा संस्थानच्या गॅझेटिअर वापरल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे हे दोन्ही गॅझेटचा संदर्भ वापरावा अशी मागणी मनोज जरांगे …

Read More »

संजय शिरसाट यांची माहिती, १२० वसतिगृह २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्‌न सोहळा संपन्न

सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. वसतिगृहासाठी शासनाने १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. सामाजिक न्याय व …

Read More »

खनिज उत्खनन क्षेत्रात महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्यापार वृद्धीच्या संधी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांच्या उपस्थितीत करारवर सह्या

महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापासून महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध व्यापारवृद्धीच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यास महाराष्ट्र उत्सुक असून खनिज उत्खनन क्षेत्रात व्यापारवृद्धीच्या मोठ्या संधी आहेत, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांनी आज महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल …

Read More »

पुण्यात रेव्ह पार्टीः एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक पहाटे ३.३० वाजता पुणे पोलिसांची कारवाई, काही महिला आणि पुरुषांना अटक

मागील काही वर्षात राज्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थाचा वापर राज्यातील तरूणाईंमध्ये वाढल्याच्या चर्चा वाढीस लागल्यानंतर आता हनी ट्रॅपचे प्रकारही वाढत असल्याचा मुद्दा नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून ही याच प्रकारचे आरोप भाजपाचे नेते तथा …

Read More »

नितेश राणे म्हणाले, मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू सरकारच्या सहाय्याने प्रकल्प उभारले

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या अॅड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सत्ताधारी पक्षातील आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमीत रमतो, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही?

राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी जयंत नारळीकर यांच्या नावे केंद्र जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविण्यता उपक्रम केंद्र

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत, अशी घोषणा तंत्रज्ञान मंत्री …

Read More »

पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन, पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा असा निर्णय घेणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य

पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण, काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) …

Read More »