Tag Archives: monsoon session

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननुसार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२५ रोजी आदेश पारित करून विदर्भातील झुडपी जंगल जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करीत झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेल्या नागरिकांना शासन बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विदर्भातील सहा जिल्ह्यातील …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे सारख्या पर्यायांचा विचार

राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. अशा परिवहन सेवांच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार असल्याची माहिती …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘ऑपरेशन मुस्कान’, ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला आणि बालकांचा शोध महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांबाबत राज्य सरकारकडून गंभीरपणे दखल

राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्या, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष …

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देणार

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …

Read More »

सपा आमदार रईस शेख म्हणाले, महाराष्ट्रात ७५ लाख उर्दू भाषिक, पण लोकराज्य उर्दूत नाही आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला मुद्दा

राज्य शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन कोणत्याही कारणाविना बंद करण्यात आले असून समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील उर्दू भाषिकांना शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालया’ला (डीजीआयपीआर) ‘लोकराज्य’ची उर्दू आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्या सोशल मिडीयावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

कांद्याचे घसरते दर आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात …

Read More »

दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी १९७२ पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्याचे लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या दारु दुकाने परवाने देण्याच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. महायुती सरकारने मद्य परवाने देऊन जनजीवन विस्कळीत करणारे धोरण आखले आहे. सत्ताधारी पक्षांनी आपले …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या चड्डी-बनियन गँगच्या उल्लेखावर निलेश राणे यांचे आव्हान हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, उगाच मोघम बोलू नका

महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी २९३ च्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी प्रस्तावावरील भाषण संपविताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळण्यात येत असून ज्या चड्डी-बनियनवर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांचे खरेच आभार मानायला पाहिजे असे सांगत आपले …

Read More »

चड्डी-बनियन व्हिडीओवरून अनिल परब यांचा टोला, सरकारने किमान दोन कपडे तरी द्यायचे बेडरूम पर्यंतचे व्हिडिओ लीक कसे होतात, यंत्रणा पोखरलीय

नुकतेच काही मंत्र्यांचे चड्डी-बनियनवरील व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे आता मंत्रीही सुरक्षित राहिले नाहीत. तर जनती सुरक्षा तर बाजूलाच राहिली असा उपरोधिक टोला शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी लगावत, चड्डी बनियन मध्ये सगळे उघडे फिरत आहेत. सरकारने किमान त्यांना दोन कपडे तरी पुरवायचे असा खोचक टोलाही शिंदे गटाचे आणि मंत्र्यांचे नाव …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, १०२ क्रमांक रुग्णवाहिका सेवा सुरळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन… विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री …

Read More »