उपराष्ट्रपती पदासाठी आयोगाने सुरु केली निवडणूकीची तयारी शक्य तितक्या लवकर वेळा पत्रकाची घोषणा करणार

संसदेच्या पावसाळी अधिवेशाला सुरुवात होताच झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही विषय केंद्र सरकारला विश्वासात न घेता अधिवेशनाच्या कामकाज पत्रिकेवर घेतले. त्यामुळे भाजपा अंतर्गत झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भाजपा नेत्यांनी थेट राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार जगदीप धनखड यांनी मुदत संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूकीच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने सुरुवात केली असल्याचे वृत्त आहे.

निवडणूक आयोगाने (ECI) बुधवारी (२३ जुलै, २०२५) सांगितले की, त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांचा समावेश असलेले निवडणूक निरिक्षक स्थापन करण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनाही अंतिम स्वरूप देत आहे. “पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्यानंतर, भारताच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवडणूक वेळापत्रकाची घोषणा शक्य तितक्या लवकर केली जाईल,” असे मुख्य निवडणुक आयोगाच्या आयुक्ताने सांगितले.

सोमवारी (२१ जुलै २०२५) आरोग्याच्या कारणास्तव जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता.

About Editor

Check Also

दिल्ली-मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या आयएसआय़च्या दहशतवाद्यांना अटक दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि मुंबई अंडरवर्ल्डमधील घटकांचा समावेश असलेल्या पाकिस्तानस्थित नेटवर्कशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *