Tag Archives: msrtc

प्रताप सरनाईक यांची माहिती, मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख गैरहजर

राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एस टी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून, बेजबाबदार वर्तन करुन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या …

Read More »

एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, रक्षाबंधनमुळे एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान १३७.३७ कोटींचे उत्पन्न

यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटी महामंडळ यात्री ॲप आणणार एसटी बरोबरच प्रवाशी वाहतूकीसाठी यात्री ॲप बनविणार

चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात आयोजित केंद्र व राज्य शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू… तेल कंपन्यांनी सुरु केलेली सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, त्यानुसार १ ऑगस्ट …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस चाकरमान्यांसाठी एसटीची तयारी, वरिष्ठ आणि महिलांना सवलत

२७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, ९ लाख ७१ हजार भाविक- प्रवाशांना एसटीने घडविले ” विठ्ठल दर्शन” आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असले

आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये मिळणार सूट एसटी प्रवाशांसाठी योजना १ जुलै पासून सुरू

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून)  प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम राज्य रस्ते परिवहन महामंडळाकडून जूनीच योजना पुन्हा एकदा सुरु

शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. वास्तविक पाहता काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्यावतीने राज्यातील बहुतांश …

Read More »