Tag Archives: new delhi

तांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज

२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द …

Read More »

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर…सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दट्या शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या केंद्राच्या पध्दतीवर नाराज

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे. केंद्रानं दुरूस्ती करण्याची तयारी दर्शवली असली, तरी शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून दिल्लीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी …

Read More »

महाराष्ट्रात येवू इच्छिणाऱ्या दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरातवाल्यांची कोरोना टेस्ट आवश्यक राज्य सरकारकडून missionbegainagain नवे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी देशातील नवी दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात राज्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चारही राज्यातून महाराष्ट्रात विमान, रेल्वे आणि रस्त्याने येवू इच्छिणाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे राज्य सरकारने बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश missionbegainagain अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार ज्यांच्याकडे …

Read More »

गृहमंत्री अनिल देशमुख तुमचे ‘ते‘ पत्रक खरे आहे का? खुलासा करण्याची भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकज येथील कार्यक्रमाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित असल्याबाबत आणि तब्लीगीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी का नाकारली नाही असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे निवेदन काल सोशल मिडीयावर उपलब्ध झाले. मात्र हे पत्र गृहमंत्री देशमुख यांचेच असल्याबाबत संशय …

Read More »