ट्रॅक्टर रॅली : लाल किल्ला आणि हिंसेप्रकरणी संयुक्त शेतकरी संघटनेचा खुलासा ते आमचे नाहीत… करणारे आंदोलक नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लाल किल्ल्यासह दिल्लीतील ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी आमचा संबध नाही. टॅक्टर रॅलीच्या निमित्ताने यात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही घुसखोरांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप संयुक्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला.

आयटीओ येथे बॅरीकेड्स तोडून दिल्लीत घुसखोरी करून लाल किल्ल्यावर झेडे लावणे, नांगलोई, मुबारका चौक आदी ठिकाणी हिंसक आंदोलन करणाऱ्यांशी आमचा संबध नाही. ज्यांनी शांततेत आंदोलन केले आहे. ते परत गाझियाबाद बॉर्डरवर परत येत आहेत. जे आंदोलनकर्त्ये हिंसक पध्दतीने आंदोलन करत आहेत. त्यांनी हा प्रकार थांबवावा आणि परत सिंघु बॉर्डर, गाझियाबाद बॉर्डरवर परत यावे असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, नांगलोई परिसरातील इंटरनेट सेवा पोलिस प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

About Editor

Check Also

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी जंतर-मंतरवर नेमके काय दिसले अभिजीत दिपके, सोनाम वांगचुक आल्यावर नेमकी काय भूमिका मांडली

शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास, नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेकडो आंदोलकांच्या गर्दीत एक ८३ वर्षीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *