Tag Archives: rain

अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चा घेतला आढावा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

गिरीश महाजन यांचे आदेश, अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा

गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात अतिवृष्टी, ८०० गावे बाधित, मुंबईत १७० एमएम पाऊस मुख्यमंत्र्याचे सर्व यंत्रणांना सतकर्तचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय …

Read More »

शशिकांत शिंदे यांची मागणी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची विशेष अधिवेशन घेण्याची मागणी

शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, …

Read More »

या जिल्ह्यांसह घाट परिसरामध्ये २४ तासांचा ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट  परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५-३० पासून रात्रौ ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे पर्यंत ३.५ ते ४.१ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न …

Read More »

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना …

Read More »

राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० …

Read More »

मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये २४ तासात पडला इतका पाऊस राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

राज्यात मागील २४ तासांमध्ये (८ जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड २०.८ मिमी, धाराशिव १३.८ मिमी, ठाणे ७.९ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज ८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे …

Read More »

राज्य सरकारचा पुन्हा इशारा, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये १० जूनपर्यंत पावसात होणार घट

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ५ जून पर्यंत मान्सूनच्या पावसात घट होणार असल्याचा अंदाज राज्य सरकारकडून व्यक्त करत पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन केले होते. त्यास आता काही दिवसांचा अवधी जात लोटत नाही तोच आज राज्य सरकारने पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक जारी करत १० जून पर्यंत पावसात घट होणार …

Read More »