काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ५ जून पर्यंत मान्सूनच्या पावसात घट होणार असल्याचा अंदाज राज्य सरकारकडून व्यक्त करत पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन केले होते. त्यास आता काही दिवसांचा अवधी जात लोटत नाही तोच आज राज्य सरकारने पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक जारी करत १० जून पर्यंत पावसात घट होणार असल्याचे जाहिर करत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन आज पुन्हा राज्य सरकारने केले आहे.
नियोजित वेळेपेक्षा आधीच केरळसह महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच सध्या जोरदार राज्यातील अनेक भागात मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये पावसाने तीन तीन दिवसांची हजेरी लावली आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाबाबत भारतीय हवामान खात्याकडून जून आणि जुलै महिन्यात पावसाची उघडीप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांनासाठी पुन्हा वाढीव मुदतीचा इशारा देत पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन केले आहे.
राज्य सरकारने जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले की, बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
तसेच राज्य सरकारने पुढे आपल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येत आहे.
Marathi e-Batmya