मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये २४ तासात पडला इतका पाऊस राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

राज्यात मागील २४ तासांमध्ये (८ जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड २०.८ मिमी, धाराशिव १३.८ मिमी, ठाणे ७.९ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज ८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) : ठाणे ७.९, रायगड ,२०.८, रत्नागिरी ६.७, सिंधुदुर्ग २, पालघर ०.९, नाशिक ३.५, धुळे १.९, नंदुरबार ०.३, जळगाव ०.९, अहिल्यानगर ५.७, पुणे ३.१, सोलापूर ३.८, सातारा ३.५, सांगली २.६, कोल्हापूर ३.१, छत्रपती संभाजीनगर ५, जालना ५.३, बीड १.२, लातूर ४.५, धाराशिव १३.८, नांदेड ०.७, परभणी २.९, हिंगोली ०.५, बुलढाणा ०.८, वाशिम ०.२, यवतमाळ ०.३, वर्धा ०.१ अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपीजी गॅस टँकरची मिनीबसला धडक होऊन २९ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टँकरमधून गॅस गळती थांबवण्यासाठी जेएसडब्ल्यू टीम पोहचली असून गळती थांबवण्याचे काम सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील एक व्यक्ती पाण्यात बुडून मृत झाली आहे. तर नाशिक जिल्हा वादळी पावसामुळे एक प्राणी, वीज पडून दोन प्राणी, धुळे व लातूर जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी दोन प्राणी आणि जळगाव जिल्ह्यात वीज पडून एक प्राणी मृत झालेले आहे. तसेच वादळी पावसामुळे जालना जिल्ह्यात दोन, जळगाव जिल्ह्यात वीज पडून एक आणि रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता अपघात मध्ये २९ व्यक्ती आणि २ प्राणी जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *